मोदी सरकारच्या ‘या’ प्लॅनमुळं एअर इंडिया सह २८ कंपन्या कर्जातून ‘उभारणार’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एअर इंडिया सह कर्जात बुडालेल्या इतर सरकारी कंपन्या विकण्याचा सरकार बऱ्याच काळापासून खर्च करत आहे. पंरतू योग्य गुंतवणूकदार सरकारला मिळत नाही. यासाठी सरकारने रणनीतिक विनिवेश (विना गुंतवणूक धोरण) या योजनेवर काम करत आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थ संकल्पात या योजनेबाबत माहिती दिली.

ससंदेत सीतारामन यांनी सांगितले की, सरकारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना रणनीतिक विनिवेश करणार आहे. म्हणजेच सरकार कंपन्यांना पुर्णता खासगी नियंत्रकाकडेच सोपवले जाणार. आता सरकारचा प्रयत्न आहे की, सरकारी कंपन्याचे विनिवेश करुन त्यात एलआयसी, एसबीआय सारख्या पीएसयू मधील शेअर खरेदी केले जावेत.साध्या भाषेत सरकार एका खात्यातून दुसऱ्या खात्यात असे आपल्याच कंपनीत शेअर खरेदी करणार.

काय आहे विनिवेश प्रक्रिया –
विनिवेश प्रक्रिया गुंतवणूक प्रक्रियेच्या उलटी असते. ज्यात गुंतवणूक म्हणजे कोणत्यातरी उद्योगात, संस्थेत आणि कोणत्याही योजनेत करायची असते. तर विना गुंतवणूक म्हणजे त्या रक्कमेला परत काढणे. खासगीकरणात सरकार ५१ टक्क्यांपेक्षा आधिक वाटा खासगी क्षेत्रात ठेवते. तर विना गुंतवणूक प्रक्रियेत आपला काही वाटा काढते. आता मात्र सरकार तसे न करता आपला सर्व वाटा काढून घेणार आहे.

२०१८ – १९ साली केले होते लक्ष साध्य –
सरकारला या वर्षात १.०५ लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम मिळवणे हे लक्ष असणार आहे. फेब्रुवारीत झालेल्या अर्थ संकल्पात तत्कालीन अर्थमंत्री गोयल यांनी विनिवेशातून ९०,००० कोटी रक्कम जमा करण्याचे लक्ष ठेवले होते. २०१८-१९ मध्ये विनिवेशातून ८०,००० कोटी रुपये लक्ष ठेवण्यात आले होते. हे लक्ष २०१८-१९ दरम्यान हे लक्ष साध्य केले होते.

या 28 कंपन्या विकण्यास सरकारने दिली मंजुरी –
मोदी सरकारचे मंत्री अरविंद सावंत यांनी नुकतेच संसदेत सांगितले की, २८ कंपन्यांच्या विनिवेशची मंजूरी सरकारने दिली आहे. यात एकूण १९ कंपन्या अशा आहेत ज्यांना बंद करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. या सर्व कंपन्या तोट्यात सुरु आहेत. मोदी सरकारने ज्या कंपन्यांच्या विनिवेशाला मंजुरी दिली आहे त्यात पवन हंस लिमिटेड, स्कूटर्स इंडिया लिमिडेट आणि एअर इंडियांचा समावेश आहे.

सिनेजगत बातम्या
Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री