यापूर्वीही पाकिस्तानच्या तावडीत होता भारतीय विंग कमांडर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – खरंतर आज भारत – पाक यांच्यात तणाव आहेत असेच तणाव यापूर्वी भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या कारगिल युद्धाच्या दरम्यान होती. आज भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात आहे. यापूर्वी १९९९ साली देखील अशीच परिस्थिती होती. भारतीय वायुसेनेचे तत्कालीन विंग कमांडर नचिकेत हे देखील पाकिस्तानच्या ताब्यात होते.आठ दिवस ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. आजची परिस्थिती देखील काही वेगळी नाही. जिनिव्हा करारानुसार पाकच्या ताब्यात असलेल्या अभिनंदन यांची देखील सुरक्षित सुटका करण्याची मागणी भारताने केली आहे आता तमाम भारतीयांना प्रतीक्षा आहे ती केवळ अभिनंदन यांच्या सुटकेची.

नचिकेत पाकिस्तानच्या ताब्यात … आणि सुटका

१९९९ च्या कारगिल युद्धानंतर हवाई दलाचे तत्कालीन विंग कमांडर नचिकेत हे देखील पाकिस्तानच्या ताब्यात अडकले होते. ते तब्बल आठ दिवस पाकिस्तानच्या ताब्यात होते. ३ जून १९९९ ला मिग -२८ या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत उतरले होते. त्यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. भारताचे पाकिस्तानातील तत्कालीन उच्चायुक्त पार्थसारथी यांनी नचिकेत यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानशी चर्चा केली होती. त्यानंतर जिनिव्हा युद्ध करारानुसार नचिकेत यांची सुटका करण्यात आली होती. आता सोशल नेट्वर्किंग सारखे मोठे माध्यम आहे पण त्यावेळी इंटरनेट इतक्या मोठ्या प्रमाणावर वापरले देखील जात नव्हते. त्यामुळे ते आठ दिवस भारतासाठी अत्यंत तणावपूर्ण होते.

अभिनंदन यांची सुटका होणार कधी ?

बुधवारी पाकिस्तानकडून घुसखोरी करण्यात आलेला F-16 या विमानाला परतवून लावताना भारतीय वायुसनकडून विमानांनी उड्डाण भरले होते. यात मिग -२१ या विमानाचा सामावेश होता. एकूण तीन विमानांपैकी एक विमान भारतात परतले नाही. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन पडले. या विमानात भारतीय वायुसेनचे विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले आहे. अभिनंदन यांचे व्हिडीओ,फोटो पाकिस्तानकडून व्हायरल करण्यात आले आहेत. भारताने जिनिव्हा करारानुसार भारतीय कमांडर अभिनंदन यांना सुरक्षित भारतात सोडण्याची मागणी केली आहे. ते पाकिस्तानात कोणत्या स्थिती राहत आहेत याची अद्याप माहिती नसली तरी देशभर अभिनंदन यांच्या सुरक्षित परत येण्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत.