फक्त 19 रुपयांत unlimited कॉलिंग आणि बरेच काही; Airtel ने लॉंच केला सर्वांत स्वस्त प्लान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ग्राहक अनेक वेळा मोबाईलला रिजार्ज करताना स्वस्त प्लान (Recharge Plans) कोणता आहे, ज्यात कमी किमतीत अधिकाधिक फायदे कसे मिळतील हे पाहतो. आपणही अशाच स्वस्तातील रिचार्जच्या शोधात असाल, तर (Airtel) कंपनीने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक 19 रुपयांचा स्वस्त प्लान ऑफर केला आहे. ग्राहक त्यांच्या सोयीनुसार हा प्लान रिचार्ज करू शकतात. एअरटेलच्या (Airtel) या स्वस्त प्लानमध्ये फ्री कॉलिंगसह (free calling) इतरही काही फायदे देण्यात आले आहेत.

एअरटेलचा हा 19 रुपयांचा बजेट रिचार्ज प्लान सध्या चर्चेत आहे. कंपनीने स्वस्तातला हा प्लान लाँच केला आहे. एअरटेलने आपल्या ग्राहकांना हा स्वस्त प्लान ऑफर करत, त्यात काही चांगले फायदेही दिले आहेत. (Airtel) ने त्यांचा हा स्वस्त 19 रुपयांचा प्लान (‘Truly Unlimited’) कॅटेगरीमध्ये ठेवला आहे. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आहे. फ्री कॉल ही या प्लानची खास बाब आहे. इतक्या कमी रुपयांत (Unlimited Call) सारखे बेनिफिट अतिशय फायदेशीर आहे. पण या प्लानमध्ये दिलेली व्हॅलिडिटी अतिशय कमी आहे. या प्लानची वैधता केवळ 2 दिवस आहे. एअरटेल ग्राहक 19 रुपयांच्या रिचार्जमध्ये दोन दिवस फ्री कॉलिंग करू शकतात. यात ग्राहकांना 200 MB इंटरनेट डेटा वापरता येणार आहे. या प्लानमध्ये फ्री SMS ची सुविधा दिली नाही.