कामाची गोष्ट ! एकदम फ्री कॉलिंगसाठी एअरटेलचे ‘हे’ 3 उत्तम प्लॅन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व कंपन्यांनी आपले रिचार्ज प्लान महाग केले असताना ग्राहकांना 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे प्रीपेड प्लान एअरटेलने आणले आहेत. एअरटेलने ग्राहकांसाठी 3 बेस्ट प्लान आणले असून हे किफायतशीर प्लान आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकाला वाजवी वैधतेसह विनामूल्य कॉलिंग आणि डेटाचा लाभ मिळणार आहे. परंतु यात काही ग्राहकांना डेटाऐवजी जास्त कॉलिंग देणारे प्लान आवडत आहेत. या ग्राहकांसाठी एअरटेलने काही खास प्लान आणले आहेत.

ग्राहक जर ड्युअल सिम फोनमध्ये एक डेटासाठी आणि एक कॉलिंगसाठी वापर करत असेल तर एअरटेलचे काही प्लान खूपच चांगले आहेत. एअरटेलचा 179 रुपयांचा प्लान चांगला आहे. या मध्ये ग्राहकाला 28 दिवसांची वैधता देण्यात आली आहे. तसेच 2 जीबी डेटा मिळतो. या प्लानचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ग्राहकाला भारती एएक्सएकडून 2 लाखांचे विमा कवच दिले जाते. एकूण 300 फ्री एसएमएस ऑफर तसेच ग्राहकांना मिळणाऱ्या कोणत्याही नेटवर्कसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंग मिळते. तसेच याचा अतिरिक्त फायदा म्हणजे ग्राहकांना म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रीम अ‍ॅपचा फ्री अ‍ॅक्सेस मिळतो.

एअरटेलचा दुसरा प्लान 379 रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकाला 84 दिवसांची वैधता आणि 6 जीबी डेटा ऑफर केली जाते. या प्लानमध्ये देशभर कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग दिली जाते. या ऑफरमध्ये फास्टॅग खरेदी केल्यास ग्राहकाला 150 रुपयांचा कॅशबॅक दिला जातो. दररोज 100 फ्री एसएमएस आणि एअरटेल एक्सट्रीम प्रीमियमचे फ्री सब्सक्रिप्शन ग्राहकांना मिळते.

एअरटेलचा तीसरा प्लान 1 हजार 498 रुपयांचा आहे. यामध्ये दररोज 100 एसएमएस आणि 365 दिवसांची वैधता मिळते. या प्लानमध्ये एकूण 24 जीबी डेटा ऑफर मिळते. यासोबत ग्राहकांना विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सट्रिम अ‍ॅप प्रीमियमचे सब्सक्रिप्शन दिले जाते. तसेच फास्टॅगच्या खरेदीवर 150 रुपयांचा कॅशबॅक दिला जातो.