Ajit Pawar | ‘ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी’; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतला मंत्रालय नियंत्रण कक्षातून आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूरनजिक इर्शाळवाडी परिसरात गावावर दरड (Khalapur Irshalwadi Landslide) कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने (District Administration) स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळीच मंत्रालयात जावून आपत्कालीन नियंत्रण कक्षाची (Emergency Control Room) सूत्रे स्वीकारत, बचाव व मदत कार्याचे संनियंत्रण केले.

इर्शाळवाडी परिसरात घडलेल्या (Khalapur Irshalwadi Landslide) या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून ही दुर्घटना मन पिळवटून टाकणारी, विषण्ण करणारी असल्याचे म्हटले आहे. बचाव पथकाने अनेकांना ढिगाऱ्याबाहेर काढून त्यांचा जीव वाचवला आहे, परंतु काही नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली असून त्यांनाही बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आवश्यक वैद्यकीय उपचार केले जात आहेत. सर्व जखमी नागरिक लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांनी प्रार्थना केली. दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या बांधवांना अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टर सह (Helicopter) आदी यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. दुर्घटनास्थळी उपस्थित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांनाही नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

Devendra Fadnavis | खालापूर इर्शाळगड दुर्घटना! मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार – देवेंद्र फडणवीसांची माहिती

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Raigad Irshalgad Landslide | रायगड : इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; मध्यरात्री दरड कोसळली! 4 जणांचा मृत्यू,70 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

Maharashtra Rain Update | पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Landslide incident in Irshalwadi village in Khalapur is sad: Sharad Pawar