Raigad Irshalgad Landslide | रायगड : इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; मध्यरात्री दरड कोसळली! 4 जणांचा मृत्यू,70 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – Raigad Irshalgad Landslide | रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) येथे दरड (Raigad Irshalgad Landslide) कोसळल्याची भंयकर दुर्देवी घटना घडली आहे. यामध्ये 70 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बुधवारी मध्यरात्री दरड कोसळ्याचे बोलले जात आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू (4 People Died) झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.

बचावासाठी अग्निशमन दल (Fire Brigade), एनडीआरएफ (NDRF) घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी पोहोण्यासाठी मुसळधार पाऊस (Heavy Rain) आणि मोठ्या प्रमाणावर असलेले धुके यामुळे बचावास अडथळा ठरत आहे. डोंगरावर घर असल्याने बचाव पथकाला मोठा सामना करावा लागत आहे. तसेच पावसामुळे डोंगराचा रस्ता अत्यंत निसरडा झाल्यामुळे देखील बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. (Raigad Irshalgad Landslide)

अंत्यत वाईट परिस्थिती या गावावर आल्याचे दिसत आहे. 25 जणांना वाचवण्यात यश आले आहे.70 जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळापर्यंत जाण्याचा रस्त्या अत्यंत निसरडा आहे. तसेच मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे घटनास्थळापर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे. कशाचीही पर्वा न करता सर्व नातेवाईक घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. बचाव कार्य जलद गतीने होण्यासाठी हायवेपासून आतील रस्ता पोलिसांकडून बंद ठेवण्यात आला आहे.

इरसालवाडी हा आदिवासी पाडा असून डोंगराच्या उतारावर आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच राज्याचे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह मंत्री उदय सामंत (Ministers Uday Samant),
दादा भुसे (Dada Bhuse) तातडीने दुर्घटनास्थळी दाखल झाले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
मंत्रालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षात (Emergency Control Room) दाखल झाले आहेत.
तेथून ते आढावा घेत आहेत.