Maharashtra Rain Update | पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Rain Update | गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात मुसळधार पावसाला (Maharashtra Rain Update) सुरुवात झाली आहे. या मुसळधार पावसामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी नागरिकांना मुसळधार पावसाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील चार दिवस पावसाचा (Maharashtra Rain Update) अंदाज व्यक्त करताना हवामान खात्याने ((IMD) नागरिकांना सतर्क राहून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच पावसामुळे वाहतूक कोंडी, रस्त्यांवर पाणी साचणे, डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका, नद्यांना पूर येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर, कोकणात (Konkan) येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील पावसाचा वेग पाहता मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्गसह (Sindhudurg) पालघरच्या (Palghar) सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, कोकणात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा, काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

रायगडसह या भागात ‘रेड अलर्ट’

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सलग दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक राज्यांत रेड अलर्ट
(Red Alert) जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड (Raigad) आणि पुण्यातील (Pune) घाट माथ्यासाठी रेड अलर्ट
जारी, तर, पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Raigad Irshalgad Landslide | रायगड : इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; मध्यरात्री दरड कोसळली! 4 जणांचा मृत्यू,70 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

Today Horoscope | 20 July Rashifal : मिथुन आणि कुंभसह या 4 राशीवाल्यांना मिळेल नशीबाची साथ, जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

Pimpri Vidhan Sabha | पिंपरी विधानसभा मतदार संघात 545 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी अभियानाचे शनिवारी, रविवारी आयोजन

Pune Cantonment Vidhan Sabha | कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील सर्व गृहनिर्माण संस्थेत शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती !