Devendra Fadnavis | खालापूर इर्शाळगड दुर्घटना! मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत; जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार – देवेंद्र फडणवीसांची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Devendra Fadnavis | रायगड जिल्ह्यातील खालापूर जवळील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याची (Raigad Khalapur Irshalwadi Landslide) घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या घटनेमध्ये काही लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे. मृतांच्या वारसांना राज्य सरकार (State Government) सर्वतोपरी मदत करणार असून, जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मृत झालेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ते म्हणाले, की ही घटना झाल्याचे कळताच काल मध्यरात्रीपासूनच मी स्थानिक प्रशासनाच्या (Local Administration) संपर्कात आहे. एनडीआरएफच्या (NDRF) दोन चमू घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या असून, आणखी दोन चमू पोहोचत आहेत. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे मदतकार्यामध्ये प्रारंभी अडचणी आल्या, मात्र आता ते गतीने होत आहे.

पुढे फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, प्राथमिक माहितीनुसार एकूण 48 कुटुंब येथे आहेत. यामध्ये पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू (Death) झाला आहे. यातून 75 जणांना बाहेर काढण्यात यश आले. जखमींवर तातडीने उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल. आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून आहोत.

Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा भाव काय? जाणून घ्या

Raigad Irshalgad Landslide | रायगड : इर्शाळवाडीवर कोसळला दु:खाचा डोंगर; मध्यरात्री दरड कोसळली! 4 जणांचा मृत्यू,70 जण ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता

Maharashtra Rain Update | पुढील 4 ते 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

Today Horoscope | 20 July Rashifal : मिथुन आणि कुंभसह या 4 राशीवाल्यांना मिळेल नशीबाची साथ, जाणून घ्या अन्य राशींची स्थिती

Devendra Fadnavis

Pimpri Vidhan Sabha | पिंपरी विधानसभा मतदार संघात 545 गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदार नोंदणी अभियानाचे शनिवारी, रविवारी आयोजन

Pune Cantonment Vidhan Sabha | कॅन्टोमेंट विधानसभा मतदार संघातील सर्व गृहनिर्माण संस्थेत शनिवार, रविवारी विशेष मतदार नोंदणी अभियान

Pune Ring Road | पुणे चक्राकार महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती !

MSRTC Bus News | एसटी रेल्वेच्या मदतीला ! रेल्वे स्थानकापासून निवासी भागापर्यंत प्रवाशांना मोफत सेवा देण्याचे नियोजन