Ajit Pawar | अजित पवार-अमित शाह यांची भेट? विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले- ‘…अशा भेटी लपून राहत नाहीत’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं (Maharashtra Bhushan Award) गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुंबईत आलेल्या अमित शाह यांची अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत गुप्त भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी अमित शाह यांच्याशी माझी भेट कधी झाली? अशा भेटी लपून राहत नाहीत, असे सांगितले.

 

महाविकास आघाडीची नागपूर येथे ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha Nagpur) होत आहे. या सभेसाठी अजित पवार (Ajit Pawar) नागपूर येथे आले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य करताना सध्या त्यांच्या विषयी सुरु असलेल्या राजकीय चर्चेवर भाष्य करताना मिश्किल टीप्पणी केली.

 

अजित पवार -अमित शाह भेट?
अजित पवार आणि अमित शाह यांची गुप्त भेट झाल्याच्या चर्चेवर अजित पवार यांनी यावेळी पदडा टाकला. कुठं झाली? केव्हा झाली? मुंबईत अमित शाह उतरल्यापासून सगळे चॅनल त्यांच्या पाठिशी होते. तिथून ते विनोद तावडेंच्या (Vinod Tawde) घरी गेले. तिथून ते सह्याद्रीला गेले. मी कालच नागपुरात येणार होते. मात्र सभा संध्याकाळी असल्यामुळे माझं अनिल देशमुखांशी (Anil Deshmukh) बोलणं झालं. याठिकाणी एक कार्यक्रम आहे, तो करुन दुपारी अनिल देशमुख यांच्याकडे आमचं जेवण आहे. त्यामुळे या सर्व चर्चा बिबुडाच्या आहेत. अशा गोष्टी लपून राहत नसतात. त्यामुळे कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम कुणीही नये असं अजित पवार म्हणाले.

 

एवढं प्रेम ऊतू का चाललंय?
दरम्यान, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलेल्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मला एक कळत नाही की माझ्यावर सगळ्यांचं प्रेम एवढं का ऊतू चाललंय? मी दोन दिवस बघतोय, गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) बोलले, उदय सामंत (Uday Samant), दादाजी भुसे (Dadaji Bhuse) बोलले. अनेकांची वक्तव्य मी ऐकली. या सगळ्यांचं एवढं प्रेम का ऊतू चाललंय ते कळायला मार्ग नाही. मी माझी भूमिका तुमच्यासमोर ठेवली आहे. इथेही अजित पवार येणार की नाही? आले तर भाषण करणार की नाही? बसणार तर कुठे बसणार? अशी चर्चा लोकांनी सुरु केल्याचे अजित पवार म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | Ajit Pawar-Amit Shah meeting? Leader of Opposition Ajit Pawar said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | नागपूरमधील मविआच्या ‘वज्रमूठ’ सभेत अजित पवार भाषण करणार नाहीत, स्वत:च केला खुलासा; राजकीय चर्चांना उधाण

Chandrakant Patil | मुलींच्या शिक्षण, सक्षमीकरणावर शासनाचा भर – मंत्री चंद्रकांत पाटील

BARTI Pune | बार्टी संस्थेच्यावतीने विविध उपक्रमांद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी