Ajit Pawar | राष्ट्रवादी पक्षाला गल्लीतला पक्ष म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांचं उत्तर; म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर (NCP) जोरदार निशाणा साधला आहे. फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा गल्लीतला पक्ष म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पलटवार केला आहे. ”शरद पवारांची उंची आणि देशपातळीवरील काम पाहून नव्या पीढीने बोलताना तारतम्य पाळलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.

 

 

”महाराष्ट्रापुरतं जे काही असेल ते मला विचारा, मी त्याचे उत्तर सडेतोडपणे देईल. देशाच्या राजकारणात आमचे वरिष्ठ बोलत असतात. कुणालाही कमी-जास्त लेखण्याचा प्रयत्न करू नये. प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करत तिथपर्यंत पोहचलेला आहे. राजकारणाविषयी खूप काही बोलता येईल.” असं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे.

 

पुढे अजित पवार म्हणाले, ”फडणवीसांच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल किंवा देशाच्या राजकारणात आमची भगिनी सुप्रिया सुळे हे लोक उत्तर देतील. शरद पवार यांची उंची काय आहे, त्यांचं देशपातळीवरील काम आणि आदराची भावना या सर्वांचा विचार करून नवीन पीढीने बोललं पाहिजे, तारतम्य पाळलं पाहिजे.”

 

 

दरम्यान, ”राजकीय जीवनात मला तीस वर्षे झाली. मला बारामतीकरांनी जरी खासदार म्हणून निवडून दिलं होतं,
पण सहा महिन्यात मी परत आलो. शरद पवार यांना दिल्लीला जावं लागलं आणि मी महाराष्ट्राच्या राजकारणात आलो.
त्यानंतर मी कधीही महाराष्ट्र सोडून बाहेर गेलो नाही. मी महाराष्ट्रात समाधानी आहे.
माझं माझं काम चाललेलं आहे,” असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar answer devendra fadnavis criticism over ncp and sharad pawar amid election goa

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Post Office Scheme | ‘पोस्ट ऑफिस’ची सर्वात जास्त फायदा देणारी योजना! केवळ 5 वर्षांच्या गुंतवणुकीत मिळतील 14 लाखांपेक्षा जास्त

 

Taarak Mehta Ka Ooltah Chashma | तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ‘या’ बोल्ड अभिनेत्रीची एंट्री, सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले फोटो

 

BSF Recruitment 2022 | 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी ! BSF मध्ये तब्बल 2788 जागांसाठी बंपर भरती; जाणून घ्या