Ajit Pawar | अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शनिवार, रविवारीही शाळा सुरु ठेवा; अजित पवारांचे शिक्षकांना आवाहन

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कोरोनाच्या संसर्गामुळे (Corona Infection) गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा सुरु (School Reopen) झाल्या आहेत मात्र, अभ्यासक्रम (Syllabus) पूर्ण करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर उभे आहे. त्यामुळे शिक्षकांनी शनिवार आणि रविवारीही शाळा सुरू ठेऊन अभ्यासक्रम पूर्ण करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

 

सोलापूर जिल्हा परिषदेच्या (Solapur Zilla Parishad) स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते. ते म्हणाले की, कोरोनामुळे (Coronavirus) दोन वर्षे होत आली मुले शाळेत गेली नाहीत. ही मुलं चांगल्या, स्वच्छ व सुंदर वातावरणात शाळेला यावीत यासाठी तुम्ही राबविलेले स्वच्छ व सुंदर अभियान कौतुकास्पद आहे. आपण राबवलेले अभियान पुणेच (Pune) नाही तर संपूर्ण राज्यात राबविण्याच्या सूचना करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकवर्गणीतून पावणेसात कोटी जमा करणे सोपी गोष्ट नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांच्या टीमने हे शक्य करून दाखवून पावणे तीन हजार शाळा स्वच्छ व सुंदर केल्या. ही जिल्ह्यासाठी, राज्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र यामध्ये सातत्य ठेवण्याच्या सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

 

दरम्यान, कोरोना महामारीमुळे राज्यातील शाळा (School) दोन वर्षे झाली बंद आहे.
संसर्गाचे प्रमाण कमी होऊ लागले त्यामुळे शाळा पुन्हा सुरू केल्या आहेत.
जेथे संसर्गाचा धोका कमी झाला आहे तेथे जिल्हा प्रशासनाने (District Administration) शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतु, शाळा सुरू होत असल्या तरी पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणं बंधनकारक नाही.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar appeal to teachers to fill the remaining syllabus by continuing school on saturdays and sundays in solapur

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा