पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Ajit Pawar | नाशिक पदवीधर मतदारसंघापासून (Nashik Graduate Constituency) सुरू झालेला काँग्रेस (Congress) पक्षातील अंतर्गत कलह थेट काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या राजीनाम्यावर येवून थांबला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच बाळासाहेब थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींना पत्र देखील लिहिले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत. यावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी बोलत असताना प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, ‘बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला अशी बातमी मी माध्यमांमध्ये पाहिली. मी त्यांना आज वाढदिवसानिमित्त फोन केला होता. त्यावेळी मी म्हटलो की, बाळासाहेब आज तुमचा वाढदिवस आहे. आनंदाचा दिवस आहे. तुम्हाला दीर्घायुष्य लाभावं या शुभेच्छा. मात्र, एक बातमी आहे आणि त्याविषयी आज तुम्हाला विचारावं की नको हे मला कळत नाही. कारण आज तुम्ही गडबडीत असाल.’ असे बोलणे अजित पवार यांनी झाल्याचे सांगितले. तर, त्यावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘दादा, मी राजीनामा दिलेला आहे. तो माझा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून त्याबद्दलचा पुढचा निर्णय घेईन.’ असे आमचे फोनवर संभाषण झाले असे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी बोलताना म्हणाले.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघात निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळावर बाळासाहेब थोरात यांनी
चिंता व्यक्त केली होती. नाशिक पदवीधरमध्ये सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी विजय संपादित
केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं.
सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो.
मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे.
हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही.
याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे.’ असं यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on resignation of balasaheb thorat phone call congress dispute
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Prajakta Mali | अभिनेत्री प्राजक्ताच्या म्हाळसा लूकने चाहते घायाळ; फोटोवर कौतुकांचा वर्षाव