Ajit Pawar | अजित पवारांनी व्यक्त केली मोदी सरकारवर नाराजी, म्हणाले – ‘केंद्राने केंद्राचे काम करावं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar | केंद्र सरकारकडून (Central Government) जीएसटी (GST) अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषद बैठक लखनऊमध्ये होत आहे. या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले आहे. तसेच पेट्रोल, डिझेलबाबत (Petrol, diesel) सुरु असलेल्या चर्चेवरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केल्यास त्याबाबत महाराष्ट्र भूमिका घेईल. तर, राज्याच्या कर लावण्याच्या अधिकारावर गदा येऊ नये अशी राज्य सरकारची भूमिका असेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, केंद्राने केंद्राचे काम करावे, पण राज्याचे जे अधिकार आहेत
त्यावर गदा येऊ नये, राज्याचे अधिकार तसेच रहावेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुद्रांक शुल्क आणि जीएसटीमधून(GST) राज्याला कर मिळतो.
जे काही ठरलंय त्याप्रमाणे चालु रहावे. कोरोनाच्या संदर्भात ज्या सवलती आधी दिल्या आहेत त्या द्याव्यात, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे अजित पवार म्हणाले, पेट्रोल डिझेल संदर्भात काही भूमिका घेतली तर तिथे काही वेगळे मत येऊ शकते. राज्य सरकारचा कर कमी करण्याच्या अधिकार आहे आणि त्यावर जर गदा येत असेल तर आम्ही भूमिका घेऊ असं म्हणत अजित पवार यांनी लखनऊमध्ये होत असलेल्या जीएसटी (GST) परिषदेच्या बैठकीबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 

Web Title : Ajit Pawar | ajit pawar gst council petrol diesel tax modi govt

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Jacqueline Fernandes | मनी लॉन्ड्रिंग केस : जॅकलीन फर्नांडिसची 25 सप्टेंबरला होणार पुन्हा चौकशी, नोरा फतेहीला सुद्धा ईडीने बोलावले

Gold Jewellery Retailers Revenue | सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ विक्रेत्यांचा ‘महसूल’ 12-14 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता – Crisil

Virat Kohli Leave Captaincy | कोहलीची ‘विराट’ घोषणा ! वर्ल्ड कपनंतर T-20 फॉर्मेटचे कर्णधारपद सोडणार