Ajit Pawar | जयंत पाटलांना फोन का केला नाही?, अजित पवारांकडून खुलासा; म्हणाले- ‘यापूर्वीही अनेक नेत्यांची चौकशी…’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे प्रदशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil ED Inquiry) यांची सोमवारी ईडीकडून तब्बल साडेनऊ तास चौकशी झाली. चौकशीनंतर आणि आधी राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांनी जयंत पाटील यांची फोन करुन चौकशी केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जयंत पाटील यांना फोन न केल्यानं चर्चांना उधाण आलं होत. अखेर जयंत पाटील यांना फोन का केला नाही याचा खुलासा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, जयंत पाटील यांना फोन केला नाही याचा विपर्यास करण्यात आला. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौकशी झाली, पण मी तेव्हाही कोणाला फोन केला नाही. मी कुठल्याच नेत्याच्या चौकशीवेळी काही बोललो नाही. काही स्टेटमेंट दिलं नाही. माझ्या कामाच्या 22 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे मी कोणत्याही नेत्याच्या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देत नाही, असं अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार पुढे म्हणाले, वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्यस्तरावरील यंत्रणा असतात.
वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार या यंत्रणांना असतो.
या यंत्रणांनी चौकशीला बोलावल्यानंतर नेतेमंडळी पूर्णपणे सहकार्य करतात.
जयंतराव पाटालांना साडेनऊला सोडल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट आपण पाहिलंय.
आता याबद्दल दबक्या आवाजात भूमिका घेतात.

यावेळी भाजपवर (BJP) निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, बेरोजगारी, महागाई यावरुन लक्ष हटवण्याचा
प्रयत्न सुरु आहे. आता नऊ वर्षे झाली. एकच वर्ष राहिले. कर्नाटकचा निकाल (Karnataka Election Result)
लागला आहे. त्यामुळे मनात शंका आली असेल असा टोला त्यांनी लगावला. तसेच मविआत (Mahavikas Aghadi)
कोणतेही मतभेद नसू, महाविकास आघाडीत वरिष्ठांचे निर्णय मानले जातात असंही अजित पवार यांनी
यावेळी सांगितले.

Web Title : Ajit Pawar | ajit pawar has explained why he did not call jayant patil after the ed inquiry

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Police Transfers – DySP / ACP | पिंपरी-चिंचवडमधील सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, ACP प्रेरणा कट्टे आणि ACP श्रीकांत डिसले यांची बदली

Jayant Patil ED Inquiry | सर्व नेत्यांचे आपल्याला फोन आले, पण अजित पवारांचा नाही; जयंत पाटलांची सूचक प्रतिक्रिया; नाराजीच्या चर्चांना उधाण (व्हिडिओ)

Ajit Pawar | ‘तू स्टँप पेपर आण, मी लिहून देतो’, ‘त्या’ प्रश्नावर अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका (व्हिडिओ)

Maharashtra DySP / ACP Transfers | राज्यातील 119 पोलिस उप अधीक्षक / सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या ! पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, पुणे एसीबीमधील अधिकार्‍यांचा समावेश