Ajit Pawar | ‘…हा मोदी साहेबांचाच करिश्मा, माझा ईव्हीएमवर विश्वास’, अजित पवारांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या डिग्रीवरुन वाद सुरु आहे. मोदींच्या पदवीची विचारणा केल्यामुळे न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांनी दंड ठोठावला होता. त्यानंतर राजकीय नेत्यांनी टीका करत मोदींच्या पदवीवर संशय व्यक्त केला होता. यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी (Ajit Pawar) पंतप्रधानांचे कौतुक देखील केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरुन (Degree) वाद सुरु असतानाच अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. कुणाला काय वाटतं, याचं मला देणंघेणं नाही. ते गेली 9 वर्ष देशाचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत. पक्षाने त्यांचा चेहरा वापरून निवडणुका जिंकल्या आहेत. आज जगभर त्यांचा पक्ष पोहोचला, हा करिश्मा मोदी साहेबांचाच आहे. त्यांच्याच नावावर इतक्या निवडणुका जिंकल्या. नऊ वर्षांनी त्यांची डिग्री काढून काय उपयोग? राजकारणात शिक्षणाचा मुद्दा गौण समजला जातो. राजकारणात अद्याप शिक्षणाची कोणतीही अट आली नाही, असं अजित पवार म्हणाले.

 

आम्ही विकासाच्या मुद्यावर एकत्र आलो आहोत. काही मुद्दे असू शकतात. सगळ्यांनी एकत्र राहयचं आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत. छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी ठेवलेल्या वेगळ्या खुर्चीवरुन काही वाद झाले नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच काही लोक मुद्दामहून वाद निर्माण करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या मणक्याचं ऑपरेशन झालं आहे. म्हणून ती खूर्ची होती, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

माझा ईव्हीएमवर विश्वास
माझा ईव्हीएमवर विश्वास आहे, जर इव्हीएममध्ये (EVM) घोळ करता आला असता
तर देशातील अनेक राज्यात विरोधी पक्ष सत्तेत आलेच नसते.
एवढ्या मोठ्या देशात एखादी गडबड कुणी करु शकत नाही.
पराभव झाला की कही लोक ईव्हीएमवर ढकलून देतात, असा टोला परभूत होणाऱ्या उमेदवारांना लगावला.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar praises pm narendra modi says why asked about degree after nine years

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ACB Demand Case On Traffic Police | 14 हजाराच्या लाच प्रकरणी 2 वाहतूक पोलिस अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

Pune PMC – Uruli Devachi – Fursungi | गावे वगळून स्वतंत्र नगरपालिका किंवा महापालिका निर्माण करण्याची मागणी ‘राजकियच’ !

Railway Protection Force (RPF) | वर्षभरात आरपीएफनं दिलं 86 लोकांना जीवदान, रेल्वे अपघातातून वाचवलं