Ajit Pawar | राज्यात इंधनाचे दर कमी होणार का? अजित पवार म्हणाले…

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Ajit Pawar | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) काही दिवसांपुर्वी इंधनावरील दर कमी केले आहेत. त्यामुळे पेट्रोल 10 रूपये, डिझेल 5 रुपयांनी स्वस्त झाले आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर भाजप (BJP) शाषित राज्यांनीही इंधनावरील असणारे मूल्यवर्धित कर घटवले. मात्र, महाराष्ट्रात देखील इंधनाचे दर कमी होणार का? याकडे महाराष्ट्र वाशीयांचे लक्ष होते. या पार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यावेळी ते पंढरपूरमध्ये आज पत्रकारांशी बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) आज (सोमवारी) सकाळी पंढरपूर इथे कार्तिकी एकादशीनिमित्त आले होते.
त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘राज्याकडे दुसरं उत्पन्नाचं साधन नाही.
महाराष्ट्राला माहिती देतो की रोज 450 कोटी रुपये हे पगार-पेन्शनला द्यावे लागतात.
हा खर्च महिन्यातला दीड लाख कोटी रुपयांच्या पुढचा आहे, हा कुठेच थांबलेला नाही.
तो करावाच लागतो. काही गोष्टी या अशा असतात की त्या थांबवता येत नाही “,
असं म्हणत इंधनाचे दर येत्या काळात कमी करण्याचा राज्य सरकारचा (Maharashtra Government) कोणताही विचार नसल्याचं ते म्हणाले.

 

पुढे अजित पवार  म्हणाले, एकंदरितच कोरोना काळ आणि टाळेबंदी, कोरोना उपचारांवर झालेला खर्च,
इतर विभागांच्या खर्चाला लागलेली कात्री या सर्वांमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली असतांना इंधन दर कपात करणे राज्य सरकारला सध्या परवडणारे नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

 

Web Title : Ajit Pawar | Ajit pawar refused to reduce fuel prices

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, नवाब मलिकांकडून संजय राऊतांना शोलेस्टाईल वाढदिवसाच्या शुभेच्छा

Mumbai NCB | जळगाव जिल्ह्यात 1500 किलोचा गांजा जप्त; मुंबई NCB पथकांची कारवाई

Earn Money | केवळ 53,000 रुपयात ‘हा’ बिझनेस सुरू करून कमवा 35 लाख, सरकार सुरूवातीपासून मार्केटिंगपर्यंत करेल मदत