Ajit Pawar | ‘कपडे काढायला लावा मला’, मास्क काढण्यास सांगणाऱ्याला अजित पवारांचा टोला

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे त्यांच्या रोखठोक भाषणासाठी आणि वक्तव्यासाठी ओळखले जातात. राज्यात कोरोनाचा (Coronavirus in Maharashtra) प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने मास्क (Mask) ऐच्छिक केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर होणारी कारवाई थांबवल्याने अनेकजण विनामास्क प्रवास करताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरताना दिसत आहेत. परंतु अजित पवार (Ajit Pawar) मात्र मास्क घालूनच पत्रकार परिषद घेतात किंवा दौऱ्यावरही कार्यकर्त्यांना भेटत असतात. मात्र, आज सांगलीत (Sangli) झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मास्क काढल्याचं पहायला मिळालं. मात्र हा मास्क काढण्याआधी त्यांनी त्यांच्या खास शैलीत मास्क काढण्याची मागणी करणाऱ्या पत्रकाराला टोला लगावला.

 

काँग्रेसचे खासदार संजयकाका पाटील (Congress MP Sanjaykaka Patil) यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) हे काल संध्याकाळी सांगलीत दाखल झाले आहेत. पाटील यांनी फार आग्रह केला त्यामुळे या लग्नासाठी काल सांगलीत आल्याचे त्यांनी सांगितले. त्यापूर्वी अजित पवार (Ajit Pawar) पत्रकार परिषदेसाठी आले आणि माईक ठेवलेल्या टेबलसमोर बसले. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना मास्क काढायला सांगितले. यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमध्ये त्या पत्रकाराला उत्तर दिले. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

पत्रकाराने मास्क काढण्यास सांगितल्यावर अजित पवारांनी, हम्म… मास्क काढा.
अजून कपडे काढायला लावा मला, अशी प्रतिक्रिया दिली. पुढे हसतच बोलताना ते म्हणाले,
आम्ही दोन वर्ष मास्क लावून प्रेस घेतो. कुठं कोणी सांगितलं नाही. सांगलीचं मला काही कळत नाही बाबा, असं ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar satirical comment when asked to remove mask in press conference in sangli

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Mumbai High Court | वैद्यकीय तपासणीत ‘ती’ चा झाला ‘तो’, पोलीस खात्यात नोकरी देण्याचे कोर्टाचे आदेश

 

Bank Rules For Cash Deposit and Withdrawal | प्रत्येक खातेधारकासाठी मोठी बातमी, बदलले बँकेत पैसे जमा करणे आणि काढण्याचे नियम

 

BKU Expelled Rakesh Tikait | भारतीय किसान यूनियनमधून राकेश टिकेत OUT, संघटनेत झाले मोठे फेरबदल