Ajit Pawar | ‘इंडिक टेल्स’ संकेतस्थळावर सावित्रीबाई फुलेंबाबत आक्षेपार्ह उल्लेख, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले-‘आता तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती (Swatantra Veer Savarkar Jayanti) दिनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) येथी अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar) आणि सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचे पुतळे हटवल्याचे प्रकरण ताजे असतानाच इंडिया टेल्स (India Tales) वेबसाईटवर महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण ( Savitribai Phule Defamation Case) केल्याचे समोर आले आहे. या प्रकारवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारवर (State Government) हल्लाबोल केला आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्तांची (Mumbai CP) भेट घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने केली.

 

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट या वेबसाईट्सवर (Hindu Post Website) कारवाई व्हायला हवी. त्यासंदर्भातील मागणी आज रष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शिष्टमंडळानं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर (IPS Vivek Phansalkar) यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे. यावेळी अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

 

अजित पवार म्हणाले, पहिल्यापासून मी सांगतोय की महापुरुषांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्या वाचाळवीरांची संख्या हल्ली वाढली आहे. आता तर कहर झाला. इंडिक टेल्स आणि हिंदू पोस्ट यांनी वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. इतका की तुम्हाला इथे सांगू शकत नाही. सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर यांच्याबबत गरळ ओकण्याचं काम केलं जात आहे. याचा तापस केला पाहिजे. मी सीपींना हेच सांगितलं की इतरांच्या बाबतीत कुणाचं काही झालं, तर तुमची यंत्रणा लगेच कामाला लागते. पण हे त्यापेक्षा कितीतरी जास्त महत्त्वाचं आहे.

 

 

 

सीपींनी वेळ मागितला आहे. त्या वेबसाईटवर हे लिखाण करण्यासाठी कुणी प्रवृत्त केले, यामागचा कोण मास्टरमाईंड आहे, हे शोधून काढण्याची आम्ही विनंती केल्याचे, अजित पवार यांनी सांगितले.

 

महाराष्ट्र सदनातील पुतळा का हलवला?

महाराष्ट्र सदनातील पुतळे हलवण्यावरुन अजित पवारांनी राज्य सरकारला संतप्त सवाल केला आहे. सावरकरांच्या जयंतीचा कार्यक्रम स्वत: मुख्यमंत्री महोदयांनी दिल्लीत घेतला. छगन भुजबळांचं महाराष्ट्र सदन निर्मितीत मोठं योगदान आहे. योग्य जागा निवडून ते पुतळे तिथे बसवण्यात आले आहेत. अशा वेळी ते अर्धपुतळे बाजूला केले जात आहेत. नंतर सरकारकडून असं वक्तव्य करतात की आमचा त्यामागचा हेतू वेगळा होता, भावना दुखवायच्या नव्हत्या.
मग हलवला कशाला पुतळा? असा संतप्त सवाल अजित पवारांनी राज्य सरकारला केला आहे.

 

Advt.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा

महाराष्ट्र सदनातील जिन्याच्या दोन्ही बाजूला पुतळे होते. यांनी जिना चढून गेल्यावर 10-15 फुटांवर वीर सावरकरांचे पोर्ट्रेट वगैरे ठेवले होते.
नंतर ते काढलंय. प्रशासनाला हे माहिती आहे की महापुरुषांबद्दल असं काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर जनता खपवून घेत नाही.
मग ज्या अधिकाऱ्यानं हे केलं, त्याचं नाव समोर आणा आणि त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी अजित पवारांनी केली.

 

 

Web Title :  Ajit Pawar | ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis government on savitribai phule defamation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा