Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : खडक पोलिस स्टेशन – साखर निर्यातीच्या बहाण्याने दीड कोटींची फसवणूक; डॉ. उमेश कृष्ण जोशीवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | साखर निर्यातीसाठी (Sugar Exports) १० टक्के अ‍ॅडव्हान्स घेऊन साखर निर्यात न करता अँडव्हान्स व कंटेनर बुकींगच्या दीड कोटी रुपयांना गंडा (Cheating Case) घातल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

 

याबाबत हसन अली पुरोहित (वय ६२, रा. अंधेरी, मुंबई – Andheri Mumbai) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १७६/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी डॉ. उमेश कृष्ण जोशी Dr. Umesh Krishna Joshi (वय ६३, रा. रामकांता अपार्टमेंट, डहाणुकर कॉलनी – Ramkanta Apartment, Dahanukar Colony) याच्यावर गुन्हा First Information Report (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार १४ मार्च २०२१ पासून आतापर्यंत घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. उमेश जोशी याची ओरा एंटरप्रायजेस (Ora Enterprises) ही कंपनी सदाशिव पेठेत आहे. फिर्यादी यांना दुबईला (Dubai) ५१८४ टन साखर निर्यात करायची होती. त्यासाठी जोशी याने त्यांना १० टक्के अ‍ॅडव्हान्स मागितले. त्यानुसार फिर्यादी यांनी १ लाख ८६ हजार ६२४ डॉलर (१ कोटी ३८ लाख ८४ हजार ८२६ रुपये) त्यांना ऑनलाईन जमा केले. आरोपीने साखर निर्यात करतो, असे सांगून वेळेवर साखर पुरविली नाही. निर्यातीसाठी त्यांनी कंटनेर बुक केले होते. तसेच साखरेच्या वाहतूकीसाठी ट्रान्सपोर्ट कंपनीला (Transport Company) पैसे दिले होते. साखर न पुरविल्याने त्यांना या ऑर्डर रद्द कराव्या लागल्या.

 

त्यामुळे त्यांना दंड करण्यात आला. साखर निर्यात न करता फिर्यादीने दिलेले अ‍ॅडव्हान्स रक्कम व कंटेनर बुंकिग असे
एकूण १ कोटी ५७ लाख ३० हजार २३० रुपयांची फिर्यादीची फसवणूक (Fraud Case) केली. तसेच महेश पगडे यांना १० कोटींचे कर्ज देतो,
असे सांगून त्यांच्याकडून ५० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे (Pune Police Crime Branch) युनिट १ चे पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni) तपास करीत आहेत.

 

Web Title :  Pune Crime News | Khadak Police Station – Fraud of Rs. 1.5 crore on the pretext of sugar export;
A case has been registered against Dr Umesh Krishna Joshi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा