Maharashtra Politics News | महाविकास आघाडीत मोठी फूट?, शिंदे गटाच्या मंत्र्याचा खळबळजनक गौप्यस्फोट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गटातील (Shinde Group) संघर्ष दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. दोन्ही गटाच्या नेत्यांकडून (Maharashtra Politics News) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. यातच शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. ठाकरे गटाने शिंदे गटात मोठी फूट पडणार असल्याचा दावा केला होता. यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाईंनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे.

 

ठाकरे गटाने केलेल्या दाव्यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिंदे गटात मोठी फूट ही त्यांची शंभरावी खोटी माहिती आहे. त्यांचा पोपट खोट्या चिठ्ठ्या काढतो, आम्ही चांगले काम करत आहोत हे त्यांना बघवत नाही. तसेच महाविकास आघाडीमधील अनेक लोक आमच्या संपर्कात असल्याचा दावा देसाई यांनी केला. (Maharashtra Politics News)

 

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना संभाजीनगर पोलिसांकडून (Sambhajinagar Police) मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी अंधारे यांनी केलेल्या तक्ररीची चौकशी करुन शिरसाट यांना क्लीन चीट दिली आहे. यावर बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, शिरसाट यांच्याबाबतीत योग्य ती चौकशी झाली आणि खरं ते समोर आलं. भाजप आणि आमच्यात चांगल्या पद्धतीनं समन्वय असल्याचंही शंभूराज देसाई यांनी म्हटलं.

Advt.

यावेळी ठाकरे गटावर हल्लाबोल करताना शंभूराज देसाई म्हणाले, आम्ही चांगले काम करतो हे त्यांना बघवत नाही.
‘शासन आपल्या दारी’ या क्रार्यक्रमाला चांगाल प्रतिसाद मिळत आहे. ते हे करु शकले नाहीत
म्हणून लोकांचे लक्ष विचलित करत आहेत. त्यांना राज्याशी काहीही देणं-घेणं नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | shinde group has claimed that there will
soon be a big split in the mahavikas aghadi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा