Ajit Pawar | अजित पवारांचा राऊत व आव्हाडांवर निशाणा; “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी कोणाचा बाप देखील करु शकत नाही…”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | मुंबईत सत्तेमध्ये असणाऱ्या महायुती सरकारची आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी शिंदे गट (Eknath Shinde Group), अजित पवार गट व भाजपा (BJP) यांनी त्यांच्या युतीला बळकटी देणाऱ्या अनेक बाबी भाषणांमधून मांडल्या त्याचबरोबर विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी मुंबईचा विकास आराखडा नीती आयोगाकडून (NITI Aayog) करण्याचा आदेश पंतप्रधान मोदींनी दिला. यावरुन राज्यामध्ये राजकारण तापले. मुंबई ही केंद्रशासित करण्याचा व महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) व राष्ट्रावादीचे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. राष्ट्रवादीकडून मुंबईमध्ये खासदार सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) मार्गदर्शनाखाली आंदोलन देखील करण्यात आले. नीती आयोगाच्या विकास आराखड्यावरुन टीका करणाऱ्या विरोधकांना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खडे बोल सुनावले आहेत. चंद्र, सुर्य, तारे आहेत तो पर्यंत मुंबई (Mumbai) महाराष्ट्रापासून वेगळी कोणाचा बाप देखील करु शकत नाही असे वक्तव्य देखील अजित पवारांनी केले आहे.

महायुतीची मुंबईमध्ये झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले की, “नुकतीच नीती आयोगासोबत बैठक झाली, काहीजण विकासाच्या बाबतीत बोलत नाहीत. राज्याचे हित कशात ते सांगत नाहीत. परंतु जातीजातीत धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम यांना करायचे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे अस पंतप्रधान सांगतात. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून संबोधले जाते. नीती आयोगाने देशातील 4 शहरे निवडली आहे. टप्याटप्प्याने त्या शहरात वाढ होईल. मुंबई वेगळी करण्याचा डाव आहे असा आरोप केला जातो. मी जे बोलतो ते खरे बोलतो, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करणं कुणाच्या बापाला शक्य नाही. काहीही सांगायचे आणि दिशाभूल करायची.” अशा शब्दामध्ये अजित पवारांनी विकास आराखड्यावर टीका करणाऱ्या प्रतिउत्तर दिले आहे.

पुढे ते म्हणाले की, “अनेकदा याप्रकारचे आरोप केले गेले. निव्वळ जनतेची दिशाभूल केली जाते.
तुम्ही विकासावर बोला, राज्याचे जनतेचे हित कशात त्यावर बोला. काही चुकत असेल तर ते दाखवा.
काम करताना एखादी गोष्ट चुकली तर ताबोडतोब दुरुस्त करण्याची तयारी आहे. वाराणसी उत्तर प्रदेशातून (UP),
सुरत गुजरातमधून (Gujarat) बाहेर काढायचे चालले आहे का? उद्या पुणे, पिंपरी चिंचवडचे (PCMC) नाव घेतले तर
तेदेखील राज्यातून काढायचे असा आरोप करणार का?” असा सवालही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

मोदी हे देशाचे कर्तुत्वावान नेतृत्व असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी मोदींचे कौतुक करत सांगितले की,
“त्यांच्या वाटचालीचा आज सर्वांत दिशादर्शक टप्पा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi)
यशस्वी नेतृत्वात भारताची विकासाकडे घोडदौड सुरू आहे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला.
झाले गेले गंगेला मिळाले, नवी पहाट नवीन सुरुवात या दृष्टीने आम्हाला पुढे जायचे आहे.
भारतातीलच नव्हे तर जगातील भारतीयांनी मोदींचे नेतृत्व मान्य केले हे सिद्ध झाले आहे.
सर्वसामान्य घटकापर्यंत योजना पोहचल्या पाहिजेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकार काम करत आहे.”
असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap News |  50 हजार रुपये लाच घेताना पुण्यातील महावितरणचा सहायक अभियंता अँन्टी करप्शनच्या जाळ्यात