Kolhapur News | अजित पवारांनी घेतली श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची भेट

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनेक जिल्ह्यात निर्बध शिथिल केले आहेत. परंतु कोल्हापुरातील (Kolhapur) कोरोना बाधितांची संख्या वाढतच असल्यानं तेथील निर्बध कायम ठेवण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोरोना (corona) नियंत्रणासाठी जिल्ह्यात आढावा बैठक घेण्यात येत आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांची न्यू पॅलेसमध्ये जावून भेट घेतली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

अजित पवार (Ajit Pawar) यांचं कोल्हापुरात (Kolhapur) आगमन होताच त्यांनी प्रथम शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मराठा आरक्षणाच्या (maratha reservation) पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. यावेळी संभाजीराजे (Sambhaji Raje) यांचे बंधू आणि माजी आमदार मालोजीराजे (Former MLA Maloji Raje) सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीमुळे कोल्हापूरमध्ये सर्वत्र चर्चा होत आहे. अजित पवार (Ajit Pawar) आणि शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यामध्ये तासभर चर्चा झाली. बैठकीदरम्यान मराठा संघटनेचे नेते देखील उपस्थित असल्याचं समजते.

दरम्यान, खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje) मराठा समाजाशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर आहे. तसेच, 16 तारखेला कोल्हापुरातुन मूक आंदोलनाला (Movement) सुरुवात होणार असल्याचं संभाजीराजे यांनी स्प्ष्ट केलं आहे. तसेच, त मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी माओवाद्यांनी मराठा समाजातील (Maratha society) तरुणांना पत्र लिहिले होते. त्या पत्राला संभाजीराजेंनी पत्रातूनच उत्तर दिले आहे. म्हणून या भेटीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

Wab Title :- ajit pawar and health minister rajesh tope meet shahu chhatrapati at kolhapur

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा