Ajit Pawar | ‘द काश्मिर फाईल्स’ ! अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिल्यानंतर भाजप आमदारांनी धरला थेट बाहेरचा रस्ता ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | सिनेमागृहात प्रदर्शित झालेला ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘द काश्मिर फाईल्स’ सिनेमा टॅक्स फ्री (Tax Free Kashmir Files) करावा अशी मागणी भाजपने (BJP) सभागृहात केली. ही मागणी लावून धरत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिलेल्या उत्तरानंतर विरोधक सभागृह त्याग करत बाहेर पडले.

 

गेल्या काही दिवसांपासून ‘द काश्मिर फाईल्स’ हा चित्रपट गाजत असल्याचं दिसत आहे. यावरून चित्रपट टॅक्स फ्री करावा अशी मागणी भाजपने केली. मात्र केंद्र सरकारने (Central Government) चित्रपट टॅक्स फ्री करावा म्हणजे तो देशभर टॅक्स फ्री होईल, असं अजित पवार म्हणाले. यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी हरकत घेतली मात्र अजित पवार यांचे भाषण सुरू असल्यामुळे अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही म्हणून भाजप नेत्यांनी सभात्याग केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पेन ड्राईव्ह (Pen Drive) सादर करत दुसरा बॉम्ब फोडला होता. मात्र अजित पवार यांनी यावर बोलताना यातील हवाच काढुन टाकली. फडणवीस यांनी सादर केलेल्या संभाषणामधील दोन व्यक्तींमधील डॉ. मुदाससीर लांबे यांची नियुक्ती 31/08/19 ला झाली होती आणि नियुक्ती 12 सदस्य असते. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते आणि मागील सरकारमध्ये शिवसेना होती परंतु त्यांना किती अधिकार होते माहितच आहे त्यामुळे यात कुठलेही तथ्य नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

दरम्यान, आमदारांचा विकास निधी (Development Fund) चार कोटीवरून पाच कोटी केला आहे.
तो पुढील वर्षापासून मिळणार आहे. आमदारांच्या चालकांना 15 हजाराचा 20 हजार, सचिवाला 25 हजाराहून 30 हजार करण्यात येत आहे,
अशी घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

 

पुणे महापालिका तसेच फक्त आणि फक्त पुण्यातील राजकारणाच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Ajit Pawar | central government should make kashmir files tax free say ajit pawar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा