Ajit Pawar | मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे, कसब्यात परिवर्तन अटळ- अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री नाही, तर कोणीही येऊ दे असे आव्हान देत कसब्यातील जनतेला बदल हवा आहे, कसब्यात परिवर्तन होणार, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅली दरम्यान अजित पवार (Ajit Pawar) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कसबा पेठ पोटनिवडणुकीतील (Pune Kasba Peth Bypoll Election) महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी प्रचार रॅलीचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Former Minister Balasaheb Thorat) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तर दुसरीकडे धंगेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress State President Nana Patole), आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांच्या उपस्थितीत कसबा मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी बैठका आणि मेळावे घेऊन मतदारांशी संपर्क साधला.

यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून यावेळी कसब्यात निश्चितपणे बदल होईल. जनतेला बदल हवा आहे. कारण दोन दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या आहेत. विशेषत: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या (Shiv Sena Chief Uddhav Thackeray) बाबतीत जे घडले आहे याचा राग शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीत दिसून येईल आणि शंभर टक्के परिवर्तन होईल. कसब्यात कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. त्यामुळे याठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित निवडून येईल असा विश्वास अजित पवार यांनी बोलून दाखवला.

रवींद्र धंगेकर हे जनतेतील उमेदवार

कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीने दिलेला उमेदवार हा जनतेतील उमेदवार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
महाविकास आघाडी एकत्रित काम करत असल्याने भाजपला भीती वाटत आहे.
त्यामुळे आमदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री प्रचारासाठी येत आहेत.
निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयावर बोलताना थोरात म्हणाले,
हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेला आवडलेला नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत.
न्यायालयात याबाबत योग्य निर्णय होईल, असे थोरात यांनी म्हटले.

Web Title :-  Ajit Pawar If not the Chief Minister, let anyone come, change in the village is inevitable – Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Shiv Sena Party Office | विधीमंडळ पाठोपाठ संसदेतील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाकडे, राऊतांसह ‘या’ खासदारांना नो एंट्री!

IPS Sudhir Hiremath | पोलिस उप महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांची केंद्रीय अन्वेषण विभागात (CBI) नियुक्ती

Pune Kasba Peth Bypoll Election | चंद्रकांत पाटलांची ‘महाविकास’वर सडकून टीका; म्हणाले – ‘दिशाहीन काँग्रेसचा उमेदवार विधानसभेत जाऊन काय करणार?’