Ajit Pawar | ‘एखाद्या नेत्याला खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला तर…’, अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांच्यावर विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी (दि.10) संताप व्यक्त केला आहे. तसेच केवळ राजकीय विरोधक आहे, म्हणून एखाद्या नेत्याला खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

जर कोणाला गोवण्याचा प्रयत्न…
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आपल्या नागरिकांसोबत काहीही चुकीचं घडलं असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मात्र उगीचच विरोधकांना त्रास देण्यासाठी जर कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तो कुणीही सहन करणार नाही. यापूर्वी अशाच प्रकारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल केले. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली. मात्र शरद पवारांनी (Sharad Pawar) त्यांना समजावून सांगितले. मी आणि जयंत पाटील (Jayant Patil) ही त्यांना भेटलो. त्यातून मार्ग काढल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

 

जर असं झालं तर…
अजित पवार पुढे म्हणाले, वास्तविक जर कुणाच्याही चुका असतील… मग ती चूक माझी असो वा इतर कुणाचीही… तर त्यावर कारवाई करण्याबाबत कुणाचंही दुमत असण्याचे काहीच कारण नाही. पण मुद्दाम कुंभाड रचून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. कुणालातरी उभं करायचं त्याला तक्रराद द्याययला लावायची आणि नंतर कारवाई करायची, असं जर झालं तर ही महाराष्ट्राची परंपरा नाही, असेही अजित पवार यांनी सांगितले.

 

तर आम्ही ते सहन करणार नाही
आम्ही साडेसतरा वर्षे सरकारमध्ये काम केले. त्यावेळी आमच्याही समोर विरोधी पक्ष होता.
तेव्हा आम्ही अशाप्रकारचा प्रयत्न कदापी केला नाही. त्यामुळे आता या रस्त्याने जर कुणी जाण्याचा प्रयत्न केला,
तर आम्ही ते सहन करणार नाही.जाणीवपूर्वक कुणाला गोवण्याचा, अडकवण्याचा प्रयत्न केला
अथवा राजकीय विरोधक आहे, म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र हे कधीच सहन करणार नाही.
राष्ट्रवादी पक्ष म्हणून आम्ही देखील हे सहन करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

 

Web Title :- Ajit Pawar | ‘If you try to implicate a leader in a false case…’, Ajit Pawar direct warning to Shinde-Fadnavis government (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ahmednagar ACB Trap | 20 हजार रुपये लाच स्वीकारताना महिला सरपंचासह लिपिक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

The Kashmir Files | ऑस्करसाठी ‘द काश्मीर फाइल्स’ची निवड; दिगदर्शक विवेक अग्निहोत्रीनी ट्विट करत दिली माहिती

Priya Bapat | अभिनेत्री प्रिया बापटच्या ट्रेडिशनल लूकने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच सुंदर आणि सोज्वळ