अजित पवार ‘उपमुख्यमंत्री’ असले तरी ते माझे ‘बॉस’ नाहीत, काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचे विधान, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातल्या सत्ता प्रयोगावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आघाडीच्या सत्ता स्थापनेबाबत एका न्युज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या पाठिंबा देण्यासाठी तयार नव्हत्या. मात्र, नंतर किमान समान कार्यक्रम तयार करण्याचे ठरल्यावर त्यांनी पाठिंबा दिला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. तर मंत्रिमंडळात अजित पवार उपमुख्यमंत्री असले तरी ते माझे बॉस नाही. आम्ही सगळे सहकारी असल्याचे सांगत त्यांनी अजित पवार यांच्याशी आपले चांगले सबंध असल्याचे सांगितले.

चव्हाण पुढे म्हणाले, किमान समान कार्यक्रम झाला नसता तर दररोज भांडणे झाली असती. त्यामुळे घटनेच्या चौकटीत बसेल असा विकास कार्यक्रम आम्ही तयार केला. त्यानुसारच सरकारचा कारभार चालणार आहे. अजित पवारांची कर्यशैली वेगळी आहे. त्यांचा स्वभाव वेगळा आहे. आमचा कोणीही बॉस नाही असे सांगत त्यांनी आम्ही सहकारी असल्याचे सांगितले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, त्यांचा अनुभव दांडगा आहे. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. पक्षश्रेष्ठी त्यांच्या अनुभवाचा चांगला उपयोग करुन घेतली. त्यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद दिल्यास काहीही हरकत नाही. राज्यात उद्योगांना पायभूत सुविधा मिळवून देण्याची माझ्या विभागाची जबाबदारी असल्याचे अशोक चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच भाजपा हा काँग्रेसचा एक नंबरचा शत्रू असल्याचे सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/