Ajit Pawar | एखादा सदस्य चुकला तर 12-12 महिने बाहेर पाठवू नका, भाजपच्या ‘त्या’ 12 आमदारांच्या निलंबनाविरुद्ध अजित पवारांकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Rainy Convention) झालेल्या गोंधळानंतर भाजपच्या (BJP) 12 आमदारांचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी निलंबन (12 MLA Suspended) केले होते. अध्यक्षांच्या दालनात गैरवर्तन केल्याचा ठपका निलंबित आमदारांवर ठेवण्यात आला होता. दरम्यान, आज सभागृहाचे पावित्र्य न राखता टिंगल टवाळी करणाऱ्यांबाबत अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली. अशा सदस्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करताना कुणाचे 12-12 महिन्यांसाठी निलंबन होऊ नये, अशी विनंती अध्यक्षांकडे करत अजित पवारांनी (Ajit Pawar) एकप्रकारे 12 आमदारांच्या निलंबन विरुद्ध भाजपचे अप्रत्यक्षरीत्या समर्थनच केले.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, सभागृहामध्ये काही घटना घडत असतात. त्यांच्यावर सत्ताधारी (Ruling party) आणि विरोधकांनी (Opposition) चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. परंतु जोपर्यंत अशा वर्तनाला रोखण्यासाठी काही नियम होत नाहीत, तोपर्यंत असे प्रकार थांबणार नाहीत. माझी विनंती आहे की, एखादा सदस्य चुकला तर त्याला चार तास बाहेर ठेवा, म्हणजे त्याला त्याची चूक लक्षात येईल. 4 तास कमी वाटले तर दिवसभर निलंबित करा. परंतु 12-12 महिन्यांसाठी कुणाला बाहेर पाठवू नका, असे पवार यांनी सांगितले.

पूर्वी अध्यक्षांना नमस्कार करायचो

अजित पवार पुढे म्हणाले, आमच्या काळात आम्ही सभागृहात कॅबिनेट मंत्र्यांशीही (Cabinet Minister) त्यांच्या मागे उभे राहून बोलत होतो. पण आताचे आमदार दर दहा मिनिटांनी एक पत्र आणून देतात. क्रॉसिंगचा नियम (Crossing Rule) तर कोणीच पाळत नाही. एखादा सदस्य बोलत असताना काहीजण गप्पा मारत असतात. आम्ही पूर्वी सभागृहात येताना अध्यक्षांना नमस्कार करायचो, जातानाही त्यांना नमस्कार करुन सभागृहाबाहेर पडायचो. परंतु आता कोणीही आमदार झाले की त्यांना आपल्याला सगळं समजतं असं वाटू लागते. एवढे वर्षे सभागृहात असूनही आम्हाला अजून सर्व समजले नाही तर त्यांना कुठून समजणार, असा सवाल त्यांनी केला.

Web Title : Ajit Pawar | maharashtra assembly winter season ajit pawars support bjp against suspension those 12 mlas said

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

 

अंगावरचे दूध वाढवण्यास ‘हे’ ७ पदार्थ उपयुक्‍त, स्तनपानामुळं बाळ आणि आईला ‘फायदा’, जाणून घ्या

कमजोरी दूर करण्याचे ‘हे’ ९ घरगुती उपाय, शरीर होईल ‘ताकदवान’, जाणून घ्या

तब्बल ३०० रोगांवर शेवगा ‘गुणकारी’ ! जाणून घ्या खास घरगुती उपाय

Maharashtra Police |  पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात 20 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने प्रचंड खळबळ

PM Narendra Modi | मुलांना कोणती व्हॅक्सीन दिली जाणार, रजिस्ट्रेशन कसे होणार? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर