अजित पवारांच्या आईंचा ८१ वा वाढदिवस : बारामतीत जमल्या पवारांच्या तीन पिढ्या

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मातोश्रींचा आज (सोमवार दि १८ मार्च) ८१ वा वाढदिवस पार पडला. एकत्र येऊन सण साजऱ्या करणाऱ्या पवार कुटुंबीयांनी अजित पवारांच्या मातोश्रींचा वाढदिवसही एकत्र येऊन साजरा केला आहे. आशाताई पवार असं अजित पवार यांच्या आईचे नाव आहे. यानिमित्त सर्व पवार कुटुंब बारामतीत एकत्र जमलं होतं. आशाताई पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांच्या तीन पिढ्या एकत्र आल्या होत्या.

बारामती येथे खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि शर्मिला पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार आणि पवार कुटुंबातील नातू असे संपूर्ण पवार कुटुंबीय आशाताईंच्या वाढदिवसांनिमित्त एकत्र जमले होते. सर्वांनी मोठ्या उत्साहात आशाताई पवार यांचा वाढदिवस साजरा केला. सर्व सण आणि उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची पवार कुटुंबीयाची खासियत आहे. दिवाळी असो किंवा आणखी कोणता मोठा सण, उत्सव असो पवार कुटुंबीय ते एकत्र येऊनच साजरा करतात.

अजित पवार यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवले. अजित पवार यांच्या वडिलांच्या निधनानंतर आशाताई पवार यांनीच मोठ्या धीराने मुलांचा सांभाळ केला. त्यांनीच मुलांना उत्तम संस्कार दिले.

आशाताई पवार यांच्या वाढदिवसाचे फोटोही समोर आले आहे. त्यात पवार कुटुंबीयांच्या तीन पिढ्या दिसत आहेत. या फोटोमध्ये अजित पवार, सु्प्रिया सुळे, सुनेत्रा पवार इतर अनेक कुटुंबीय आणि पवार कुटुंबातील नातू दिसत आहे. मोठ्या उत्साहात आणि आनंदात सर्वांनी आशाताई पवार यांचा वाढदिवस साजरा केला आहे. सर्व पवार परिवार फोटोमध्ये आनंदी दिसत आहे.