Ajit Pawar | ‘आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काय काम केले’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विकास कामांमधील गुणवत्तेबद्दल नेहमीच आग्रही असल्याचे दिसतात. अजित पवार (Ajit Pawar)  यांचा परेक्शनिस्टपणा आज पुन्हा एकदा पहायला मिळाला. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील (Savitribai Phule Pune University) खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील (Khashaba Jadhav Sports Complex) पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक (Synthetic Track) व इनडोअर हॉल (Indoor Hall)  इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. हॉलच्या सिलिंगच्या उंचीत त्रुटी दिसताच अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच आम्ही तुम्हाला किती पगार देतो, हे काम काय केलं अशी विचारणा केली.

अजित पवार (Ajit Pawar ) यांनी उद्घाटन केलेल्या कामाचे बारकाईने पाहणी केली. यावेळी एका ठिकाणी हॉलच्या सिलिंगच्या उंचीत फरक दिसल्यानंतर अजित पवारांनी तात्काळ तो अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. आर्किटेक्चरला (Architecture) यासंदर्भात विचारणा देखील केली. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher Technical Education Minister Uday Samant) हेही उपस्थित होते.

 

अजित पवार यांनि सिलिंगमधील दोषाबाबत अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी अंजली भागवत (Anjali Bhagwat) यांनी तशा सूचना केल्याचे सांगितले.
यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
अंजली भागवतने तुम्हाला चांगलीच सूचना केली. मात्र, तुम्ही ती उंची चुकीची केली त्याबाबत मी सांगत आहे.
काहीही कारण सांगतात, असं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं.

 

Web Title :- Ajit Pawar | NCP leader ajit pawar angry on officers over bad quality work in sppu pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा