Ajit Pawar | वेदांता प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीची सरकारवर टीका, फडणवीस रशिया दौऱ्यावर, अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) कधी काय होईल सांगता येत नाही. मात्र, सध्या राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. मविआ सरकार कोसळल्यापासून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेत शिंदे सरकारवर (Shinde Government) हल्लाबोल करत आहेत. महाराष्ट्रातील दोन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्याने आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी देखील सरकारवर टीका केली. शिवसेना-राष्ट्रवादीकडून टीका होत असताना राज्यात वेगळ्या राजकीय भेटीगाठी देखील होताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) रशिया दौऱ्यावर गेले असताना या भेटीगाठी होत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली.

 

अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा आजचा टायमिंग वेगळा आहे. कारण देवेंद्र फडणवीस सध्या रशिया दौऱ्यावर (Russia Tour) गेले आहेत. रशियामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांच्या तैलचित्राचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दुसरीकडे आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पशूंमध्ये वाढता लम्पि स्किन आजार (Lumpy Skin Disease) आणि थांबलेला विकास निधीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार सह्याद्री अतिथीगृहात गेले आहेत.
मात्र, राज्यातील गेल्या काही दिवसांपून राजकीय घडामोडी पाहता या भेटीकडे विशेष लक्ष लागलं आहे.
अजित पवार यांच्यासोबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले असल्याची माहिती समोर आली आहे.

 

दरम्यान, यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) हे देखील शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते.
या भेटीनंतर थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना बजेटला कामे आली त्यांना स्थगिती दिली गेली, ती उठवावी,
अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली. डीपीडीसी (DPDC) होत नाही. कामे होत नाही.
कामे लवकर मार्गी लावावी, अशी मागणी केल्याचे थेरात यांनी सांगितले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar meet cm eknath shinde when bjp leader devendra fadnavis on russia tour

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Box Office Record | रणबीर-आलियाच्या Brahmastra च्या समोर फेल झाला अल्लू अर्जुनचा Pushpa, बॉलीवुडचाच डंका

Uric Acid | महिलांमध्ये किती असावे यूरिक अ‍ॅसिड? पहा कंट्रोल करण्यासाठी चार्ट

Diet Tips For Uric Acid | सर्वात बेस्ट आहे ‘या’ पीठाची भाकरी, ताबडतोब कमी होईल यूरिक अ‍ॅसिड, सांधेदुखीसुद्धा होईल दूर