Ajit Pawar | येत्या काळात काही आमदार घरवापसी करतील; अजित पवारांनी दिले राजकीय उलथापालथीचे संकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | कसबा पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll Election) मविआने भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. 28 वर्षापासून भाजपच्या (BJP) ताब्यात असलेला कसब्याचा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला. कसब्याची जागा जिंकून मविआने भाजपला पराभूत करणं अवघड नसल्याचे दाखवून दिले. मविआने एकत्र येऊन भाजपच्या गडाला सुरुंग लावला आहे. कसब्यात यश आल्यानंतर आगामी महापालिका आणि विधानसभेच्या दृष्टीने मविआने ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केल्याचे संकेत अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत.

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, मागील काही वर्षात भाजपमध्ये गेलेले 40-45 नेते पूर्वाश्रमीचे काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीचे (NCP) आहेत. येत्या काळात आपल्या पक्षनेतृत्वाला सांगून ते स्वगृही येऊ शकतात. शेवटी माणसाकडून चुका होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा करिश्मा, आपली हक्काची मते, पक्षाची मते या भरोशावर निवडून येणं त्याकाळी संबंधित नेत्यांना सोपं गेलं. शेवटी आमदाराला त्याच्या मतदारसंघाचा विकास करायचा असतो.

पूर्वीच्या काळासारखं एखाद्या विचारधारेला मानून विरोधात राहिलं तरी चालेल मात्र पक्ष सोडणार नाही, अशी लोकांची मानसिकता आता राहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मागील काळात झालेल्या चुका सुधारु शकतात. असं असताना भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार (BJP MLA) येत्या काळात स्वगृही परत आल्याचे पाहायला मिळतील असे सांगत अजित पवारांनी आगामी काळात राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

2014 मध्ये आमचे काही नेते आम्हाला सोडून भाजपमध्ये गेले. काहींनी 2019 मध्ये पक्ष बदलला.
भाजपने असे चित्र निर्माण केलं की नरेंद्र मोदींचा करिश्मा संपूर्ण भारतावर झाला आणि सत्तेत आल्यावर मोठे बदल होतील, असा भ्रम निर्माण केला.
त्यांच्याकडे बघून लोकांनी मतदान केलं आणि त्यांना क्लिअर मॅजोरिटी मिळाली.
राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्यानंतर देशात कोणालाच असं बहुमत मिळालं नाही.
त्यामुळे ज्यांना राजकारण करायचे आहे, मतदारसंघ सुरक्षित ठेवायचा आहे, असे नेते भाजपमध्ये गेले.

मात्र आता परिस्थिती बदलत असून तिकेड गेलेले लोक पुन्हा घरवापसी करु शकतात, असे सांगत अजित पवार
यांनी मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत दिले. तसेच मागील काळात झालेल्या चुका हे लोक सुधारु शकतात.
राजकारणात कालचा शत्रू आजचा मित्र, तर आजचा मित्र उद्याचा शत्रू असतो असेही अजित पवारांनी सांगितले.

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar says many mlas from bjp may rejoin congress and ncp

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Deepak Kesarkar | ‘आम्ही सांगत होतो तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु…’, दीपक केसरकारांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी