Ajit Pawar On Amruta Fadnavis | अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले – ‘मला जर कुणी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Amruta Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. झोकून काम करणारा नेता मुख्यमंत्री झाला तर आवडेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं होत. यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारलं. तसेच सत्ताधाऱ्यांचा सूर बदलल्याचा मुद्दा उपस्थित केला असता अजित पवारांनी यावर भाष्य केलं. (Ajit Pawar On Amruta Fadnavis)

 

अमृता फडणवीस यांच्या विधानावर बोलताना अजित पवार म्हणाले, मग त्यात वाईट काय आहे मला जर कुणी चांगलं म्हणत असेल, तर मला त्याचं समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलं म्हणतील. त्यांनी काय बोलाव हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याला काय उत्तर देऊ शकतो हे मला समजत नाही, असं अजित पवार म्हणाले.

 

गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी आम्ही दगड मारुन सभा बंद पाडणारे लोक असल्याचे विधान केले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, गुलाबराव पाटील यांनी वेगवेगळी विधानं केली आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) कुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. शिवसेनेने त्यांना आमदार केले. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीच त्यांना तिकीट दिलं. आता त्यांच्यात काही राजकीय मतमतांतरं झाली आणि ते शिंदे गटात गेले.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हायला आवडेल असे विधान मुलाखतीत केलं होत.
यावर बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मुख्यमंत्री कोणी झाले तरी मला चालेल, फक्त त्यांनी योग्य काम करायला पाहिजे.
जी व्यक्ती चोवीस तास महाराष्ट्रासाठी (Chief Minister of Maharashtra) झोकून काम करेल त्याच्यामागे मी उभी राहीन.
मात्र जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकतील असे वाटेल त्यांनी सत्तेत यावे.
तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे की,
तो फक्त प्रगतीसाठीच काम करणारा आहे. स्वत:च्या घरासाठी काम करणारा नाही, असेही अमृता फडणवीस शेवटी म्हणाल्या.

 

Web Title :- Ajit Pawar On Amruta Fadnavis | ncp leader ajit pawar comment on statement of amruta fadnavis about become chief minister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कोणी काहीही बोलत असेल तर…’

Ambadas Danve | ‘सभेला कुणी आडवं आलं तर…’, पाचोऱ्यातील सभेपूर्वी अंबादास दानवेंचा शिंदे गटला इशारा

PM Kisan Samman Nidhi | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 कोटी 10 लाख शेतकऱ्यांना लाभ – कृषि आयुक्त सुनील चव्हाण