Ajit Pawar On Konkan Railway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी अजित पवार सरसावले; आरक्षणाची दलाली करणाऱ्या रॅकेटची चौकशी करा, केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Konkan Railway | गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) काळात कोकणात जाणाऱ्या गाड्यांचे आरक्षण (Railway Ticket Reservation) अवघ्या एका मिनिटात फुल्ल होत आहे. रेल्वे अधिकारी आणि तिकिटांच्या दलालांमधल्या अभद्र युतीमुळेच हे होत असावं. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात, त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येनं रेल्वेच्या तिकिटांचं आरक्षण करुन चढ्या दरानं त्यांची विक्री करण्याचं रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणा-कोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोण-कोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वे (Central Railway) आणि कोकण रेल्वेनं चौकशी करावी. अशा रेल्वे दलालांवर (Railway Brokers) नियंत्रण ठेवावं. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्याची मागणी अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला (Union Ministry of Railways) लिहिलेल्या पत्रातून केली आहे. (Ajit Pawar On Konkan Railway)

 

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी बिष्णोई (Ashwini Bishnoi) आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना अजित पवार यांनी पत्र लिहिले आहे. पत्रात म्हटले आहे की, गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषत: कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषत: कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी आणि नियोजन प्रत्येक चाकरमानी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा व सांस्कृतिक संचित आहे. (Ajit Pawar On Konkan Railway)

 

 

काय म्हटले पत्रात?

कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी आहे. गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना आतापासूनच प्रतीक्षा यादींचे (Waiting List) फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मिनस वरून (Mumbai Chhatrapati Terminus) 15 सप्टेंबरला सुटणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेसची (Konkan Kanya Express) प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनिटातच हजारापार गेल्याचे समोर आले आहे. तर 16 सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर ‘रिग्रेट’ हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.

यंदा गणेशोसत्सव 19 सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे 17 सप्टेंबरचे या प्रवासाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. परंतु पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असल्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबंध आहेत, या गैरप्रकारात कोण कोण सामील आहे. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

 

 

Web Title :  Ajit Pawar On Konkan Railway | maharashtra opposition leader ajit pawar demands to
investigate the racket of brokering the reservation of konkan railway tickets

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा