Ajit Pawar On Marathi Language | ‘इकडं येऊन पैसे कमवता आणि मराठी पाट्यांना विरोध करता’; अजित पवारांनी खडसावले !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar On Marathi Language | राज्य सरकारने महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाचं नामफलक (Nameplates In Marathi) हे मराठी भाषेत असावं असा कायदा आणला आहे. मात्र याला काही व्यापाऱ्यांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar On Marathi Language) मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांना खडसावलं आहे.

 

आपल्याच मुंबापुरीत यायचं दोन पैसे कमवायचे त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला (Marathi Language) विरोध करायचा, असं करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपुजनावेळी ते बोलत होते.

 

महाराष्ट्रात (Maharashtra) राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत या मातीचे ऋण विसरू नका ?, असा सवाल अजित पवारांनी केला.

 

दरम्यान, मराठी भाषा भवनासाठी जेवढ्या निधीची (Fund) गरज आहे तेवढा निधी देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. मराठी भाषा भवनासाठी सरकार प्रयत्न करत राहिले, अनेक अडचणी आल्या पण आता मराठी भाषा केंद्राचं मुख्य केंद्र (Main Center) मुंबईत आणि उपकेंद्र नवी मुंबईत उभं राहत असल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

 

Web Title :- Ajit Pawar On Marathi Language | ajit pawar hits back to who oppose marathi language in mumbai maharashtra

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा