Ajit Pawar On Rohit Pawar | अजित पवारांचा रोहित पवारांवर निशाणा, उन्हाळ्यात आम्ही काय चुना लावून बोंबलत बसू का?

पुणे : Ajit Pawar On Rohit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आज शिरुरमध्ये (Shirur Lok Sabha) महायुतीचे उमेदवार (Mahayuti NCP Candidate) शिवाजीराव आढळराव (Shivajirao Adhalrao Patil) यांच्या प्रचारासाठी मॅरेथॉन सभा घेत आहेत. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव (Ambegaon-Ghodegaon Sabha) येथील जाहीर सभेत अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत पाण्यावरून आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिरूरचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर देखील टीकास्त्र डागले.

रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना अजित पवार म्हणाले, शिरुरमध्ये धरण आहे. पाणी आपल्या उशाशी आहे, मात्र काहीजण पाणी पळवून नेत आहेत. जुन्नर आणि आंबेगावला जेवढी पाण्याची गरज आहे, तेवढच ठेवा. वर बोगदा काढा आणि ओव्हर फ्लोचे पाणी घेऊन जा. परंतु आता खालून बोगदा काढला तर उन्हाळ्यात आम्ही काय चुना लावत बोंबलत बसू का? अशी टीका अजित पवार यांनी केली.

तर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडताना अजित पवार म्हणाले, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी शरद पवारांना वाढवले, नंतर त्यांच्या विचारधारेला सोडून शरद पवार गेलेच ना? पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकात स्वतः लिहिले आहे. मी ३५ वर्षे साथ दिली. पण आता मी ६० च्या वर गेलो, कधीपर्यंत थांबायचे मी आता. मी अनेक वेळा साहेबांना सांगितले होते, असे अजित पवार म्हणाले.

शिरूरचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यावर यांना खोचक टोला लगावताना अजित पवार म्हणाले, शिवरायांची भूमिका ते अगदी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या गोडसेंची भूमिका, समाज व्यसनाधीन होईल अशा जाहिराती करून आपले पोट भरू नये.

अजित पवार पुढे म्हणाले, बारामतीत मी आईसोबत मतदानाला गेलो. आता मी ज्या आईच्या पोटी जन्माला आलो, तिला सोबत घेऊनच मतदानाला जाणार ना? बरं पहिल्यांदाच गेलो असे आहे का? प्रत्येक मतदानाला जातो. यांच्या पोटात आत्ताच का दुखलं? म्हणाले दादा राजकारण करत आहेत. आता यात कसले राजकारण आले. (Ajit Pawar On Rohit Pawar)

अजित पवार म्हणाले, आत्ताचे खासदार काहीही कागदपत्रे दाखवतात आणि म्हणतात मी अजितदादांकडे पाठपुरावा केला.
गडी अलीकडच्या तारखा टाकतोय आणि कागद नाचवतोय. धादांत खोटं बोलतो हा माणूस.

मी प्रत्येकाची कामं नक्की करतो. आता भाजपचे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटलांना विचारा,
ते विरोधात असतानाही मी कामं करायचो.
कारण उद्या ते आपल्याकडे परत ही येतील, शेवटी राजकारण आहे.
आता लक्षात ठेवा हे भावनिक करतील, आता माझा पुतण्या बारामतीत लढला.
आता काय रडून प्रश्न सुटणार आहेत का? तुमचे प्रश्न भावनिकतेने सुटणार नाही, पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, पद गेल्यावर कोणी कोणाला विचारत नाही.
२६/११ नंतर राजीनामा देऊन आर. आर. पाटील गावाला गेले.
सहा महिन्यांनी भेटायला आले तर म्हणाले एकहीजण भेटायला आला नाही. पदाशिवाय काही नाही.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amol Kolhe On Ajit Pawar | अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा, आढळरावांनाही दिले आव्हान, ”स्वतःच्या कंपनीचं उखळ पांढरं करणारा…”

Yerawada Pune Crime News | पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Rupali Chakankar | रूपाली चाकणकरांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षांची मागणी

Murlidhar Mohol Kasba Rally | ‘मोदीजींचंच नेतृत्व देशाला भारी’ मुरलीधर मोहोळ यांच्या कसब्यातील प्रचारात घुमली आरोळी