Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

कर्जत : Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवार आणि त्यांच्या समर्थक ९ नेत्यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीसह आणखी एका भेटीबाबत अजित पवार यांनी कर्जत येथील पक्षाच्या शिबिरात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Ajit Pawar On Sharad Pawar)

अजित पवार म्हणाले, पटेल, तटकरे, छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, रामराजे निंबाळकर, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे १०-१२ जण देवगिरीला बसलो होतो. पुढे काय करायचे यावर चर्चा सुरू होती. शरद पवारांना थेट कसे सांगायचे म्हणून सुप्रियाला माझ्या घरी बोलावून घेतले. (Ajit Pawar On Sharad Pawar)

अजित पवार म्हणाले, लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो. तेव्हा तिने मला ७ ते १० दिवस द्या, मी साहेबांना समजावते असे म्हटले. आम्ही दहा दिवस थांबलो. जयंत पाटील, अनिल देशमुखही होते. सरकारमध्ये गेले पाहिजे. आमदारांच्या मतदारसंघात विकास थांबलाय, कामांना स्थगिती दिली आहे. त्यानंतर आम्ही थेट साहेबांकडे गेलो. त्यांनी सर्व ऐकले आणि बघू असे म्हटले.

याबाबत खुलासा करताना अजित पवार पुढे म्हणाले, वेळ जात होता, एकदा काय तो निर्णय घ्या हे सातत्याने सांगत होतो. १ मेच्या आधी तुम्ही सरकारमध्ये जा, मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे मला सांगितले. त्यानंतर २ मे रोजी केवळ घरातील चौघांना शरद पवार राजीनामा देणार हे माहिती होते. त्यानंतर राजीनामा दिला. सगळेच आश्चर्य चकीत झाले. त्यानंतर वेगळे वातावरण तयार केले.

शरद पवारांवर थेट आरोप करताना अजित पवार म्हणाले, यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. जितेंद्र आव्हाड, आनंद परांजपे यांना बोलावून घेतले. त्यानंतर उद्यापासून यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर काही लोक आंदोलनाला बसवा असे सांगितले. राजीनामा परत घ्या, परत घ्या बोलायला सांगितले. जर राजीनामा द्यायचा नव्हता मग दिला कशाला? तिथे जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता. मला एक सांगत होते, इतरांना दुसरे सांगत होते.

अजित पवार म्हणाले, सुप्रिया सुळेला राष्ट्रीय अध्यक्ष करा याची सर्वांनी तयारी दाखवली होती.
धरसोड वृत्तीने आम्हाला गाफील ठेवले गेले. मग एक घाव दोन तुकडे करायचे ठरवले. २ जुलैला आम्ही शपथ घेतली.
३० जूनला कार्यकारणी झाली होती. त्यात सगळे होते.

अजित पवार पुढे म्हणाले, २ जुलैला घेतलेला निर्णय आवडलेला नव्हता. मग १७ जुलैला आम्हा सर्व मंत्र्यांना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला बोलावले. जर निर्णय आवडला नव्हता तर बोलावले कशाला? आधी मंत्री या, नंतर आमदार या.
आमदार घाबरत असताना मी सगळ्यांना नेले. चहापाणी झाले. तिसऱ्या दिवशी ७-८ जणांशी चर्चा करून सर्व सुरळीत
होणार होते. या सगळ्यात वेळ गेला. आम्हाला पुढे जायचे आहे ते आम्ही म्हणत होतो.
सगळे पूर्ववत करायचे असा निरोप यायचे. याचा अर्थ तुम्ही आम्हाला गाफील ठेवता का?

पक्ष फुटीच्या पडद्यामागील घडामोडी सांगताना अजित पवार म्हणाले, १२ ऑगस्टला मला एका उद्योगपतीने पुण्यात
जेवायला बोलवले. तिथे मला सांगितले. वरिष्ठांशी चर्चा झाली. तिथे जयंत पाटील येतील, तुम्ही असाल आणि मी असेन,
असा निरोप आला. दुपारी जेवायचे ठरले. निरोप आल्यानंतर मी गेलो.

अजित पवार म्हणाले, जुलै झाला त्यानंतर ऑगस्ट आला. दीड महिना झाला, जर तुम्हाला करायचे नव्हते तर गाफील
कशाला ठेवायचे. आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच लोकांची कामे करत आहोत. आम्ही चांगल्याप्रकारे सरकार चालवू शकत नाही का.
कोरोना काळात कोण काम करत होते हे सर्वांना माहिती आहे. नवीन पिढीसाठी पुढील १०-१५ वर्ष महत्त्वाचे होते.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मनोरुग्ण मुलाकडून वडिलांचा खून, चाकण परिसरातील घटना

कुटुंबाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, चार जणांवर FIR; दापोडी परिसरातील घटना

पिंपरी : विनयभंग करुन पतीला मारहाण, मदतीसाठी आलेल्या महिलेच्या डोक्यात घातला दगड; आरोपी गजाआड

Maharashtra MLA Disqualification Case | आमदार अपात्रता प्रकरण : शिंदे गटासाठी सामंत, केसरकर यांची साक्ष महत्त्वाची, अधिवेशन काळातही सुनावणी