मुंबई : Maharashtra MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची (Shivsena MLA) सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर सध्या सुरू आहे. सध्या ठाकरे गटाच्या आमदारांची साक्ष झाल्यानंतर आता पुढील आठवड्यात शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant), दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची साक्ष होणार आहे. शिंदे गटासाठी सामंत आणि केसरकर यांची साक्ष महत्वाची ठरणार आहे. सुनावणीस उशीर होत असल्याने विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे हिवाळी अधिवेशन काळात नागपूरात सुद्धा सुनावणी घेणार आहेत. (Maharashtra MLA Disqualification Case)
पुढील सुनावणीच्या साक्षीमध्ये शिंदे गटाकडून काही महत्वाचे मुद्दे मांडले जाणार आहेत. शिवसेनेचे काही नेते दुसऱ्या टप्प्यात शिंदे यांच्या गटात जाण्यासाठी सुरतला रवाना झाले होते. यामध्ये केसरकर, सामंत व आमदार योगेश कदम यांची साक्ष शिंदे गटासाठी महत्वाची ठरणार आहे. या आमदारांची ठाकरे गटाचे वकील कसून उलटतपासणी घेतील. (Maharashtra MLA Disqualification Case)
शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांना दिले आहेत. त्यामुळे आगामी कामकाज अध्यक्षांना जलदगतीने करावे लागणार आहे. आता अवघे ३० दिवस नार्वेकर यांच्याकडे उरले आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक