Pune Pimpri Chinchwad Crime News | कुटुंबाला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी, चार जणांवर FIR; दापोडी परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करत असताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या तिघांना मारहाण (Beating) करुन जखमी करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी चार जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात (PCPC Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.29 नोव्हेंबर) रात्री साडे दहाच्या सुमारास दापोडी येथे घडला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

याबाबत हरीसिंग लच्छी पांचाळ (वय-43 रा. मयुर वाटीकेच्या पाठीमागे, दापोडी) यांनी गुरुवारी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन अजय शिंदे (वय-32), 29 वर्षीय महिला आरोपी, आनंद गायकवाड (वय-38), अशोक साळवी (वय-70 सर्व रा. आत्तार वीटभट्टी जवळ, दापोडी) यांच्यावर आयपीसी 324, 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फटाके फोडल्याच्या कारणावरुन आरोपी आणि फिर्यादी यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन आरोपी यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्य़ादी यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ केली. त्यावेळी आरोपींना समजवण्यासाठी फिर्यादी व त्यांची पत्नी गेले. त्यावेळी आरोपींनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हरीसिंग पांचाळ यांच्या मुली मध्ये आल्या असता आनंद गायकवाड याने त्याठिकाणी पडलेली विट पांचाळ यांच्या मुलीच्या डोक्यात मारुन तिला जखमी केले. तर अजय शिंदे व महिला आरोपी यांनी पांचाळ यांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तसेच आम्ही तुम्हाला सोडणार नाही, एक एकाला मारु टाकू अशी धमकी दिली. पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manoj Jarange Patil | मंत्रीच कायदा, सुव्यवस्था बिघडवतायत, भुजबळ-राणेंना सरकारचे पाठबळ, जरांगेंनी व्यक्त केला संशय

Pune Water Supply | पुण्यात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात, गेल्यावर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये कमी पाणीसाठा

Pune Accident News | दुर्देवी ! दाट धुक्यामुळे पुणे-नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर जखमी

ACB Trap News | न्यायालयाच्या आदेशावरुन जमीन नावावर करण्यासाठी लाचेची मागणी, रक्कम स्वीकारताना तलाठी व खासगी इसम अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime News | मुलाकडून वयोवृद्ध आई-वडिलांना मारहाण, बोपोडी परिसरातील घटना; मुलाला अटक