Ajit Pawar | अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त पाथरी येथे “आरोग्य धनसंपदा” अभियान आयोजित केले आहे. शहरातील शांताबाई नखाते विद्यालयात 22 जुलै रोजी आरोग्य धनसंपदा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हे अभियान राबविण्यात येणार आहे.

उद्घाटन आरोग्य धनसंपदा शिबिर…
आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन आमदार बाबाजानी दुर्रानी (MLA Babajani Durrani) यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून पाथरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुमंत वाघ, परभणी येथील मेंदू व मणके विकार तज्ञ डॉ. श्रीपाद आंबोरे जालना येथील एमडी मेडिसिन डॉ. सुरज तौर, तज्ञ डॉक्टर म्हणून डॉ. अपूर्व सोनी, डाॅ. विनायक इंगळे, डॉ. पंकज दरक, डॉ. आरएन इक्कर, डाॅ. सारिका कुलकर्णी, डॉ.जयश्री मोगरे, डॉ. शेख सलीम यांची उपस्थिती राहणार आहे. 22 जुलै गुरुवार रोजी पाथरी येथील शांताबाई नखाते विद्यालयात आरोग्य धनसंपदा या तपासणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

पदाधिकाऱ्यांचे तपासणी करण्याचे आवाहन…
परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिका्यांनी नागरिकांना या मोफत शिबिरात स्वत: चे तपासणी करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title :- Ajit Pawar | Organizing free health camp in Pathriti on the occasion of Ajit Dad’s birthday

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supreme Court | महाराष्ट्र सरकारला उपचाराचे दर ठरवण्याचा अधिकार नाही

‘या’ पद्धतीने आणि नाण्यांच्या बदल्यात मिळताहेत 1900 रुपयांपासून 1.5 लाख, तुमच्याकडे असतील तर ताबडतोब करा ‘हे’ काम

Earthquake | काही तासात देशात 5 ठिकाणी भुकंपाचे धक्के; बिकानेर, मेघालय तीव्र धक्क्याने हादरला