Ajit Pawar | सोमेश्वर कारखान्याला माझं उसाचं कांडक येत नाही, पण… – अजित पवार

पोलीसनामा ऑनलाइन – Ajit Pawar | सोमेश्वर कारखान्याला माझं उसाचं कांडक येत नाही. पण शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज मला करायचं आहे. त्यामुळे सोमेश्वर विकास पॅनलच्या उमेदवारांना इतक्या मतांनी निवडून द्या की मी मी म्हणणाऱ्यांची बोबडी वळली पाहिजे. हे सगळ्या महाराष्ट्राला पाहूद्या, असे भावनिक आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. दरम्यान, सोमेश्वरचा प्रतिटन ३१०० रूपये हा भाव राज्यात कुणी देऊ शकणार नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सोमेश्वर पॅलेसमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलच्या सांगता सभेत ते बोलत होते. याप्रसंगी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, आमदार संजय जगताप, माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, छत्रपतीचे अध्यक्ष प्रशांत काटे, माजी आमदार अशोक टेकवडे, विश्वास देवकाते, विजय कोलते, सतीश काकडे, शहाजी काकडे, प्रमोद काकडे, नीता फरांदे, राजेंद्र ढवाण, तुकाराम जगताप, आर. एन. शिंदे उपस्थित होते.

Pune Metro | विनाचालक धावणार पुणे मेट्रो; काम अंतिम टप्प्यात

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, भविष्यात सोमेश्वरचे साखर युनिट, डिस्टिलरी व सहवीज निर्मिती प्रकल्प वाढवायचे आहेत.
त्यामुळे कोणीही गाफील राहू नका.क्रॉस मतदान करू नका असे आवाहनही त्यांनी केले. १५२ गावातून २१ जण निवडायचे आहेत.
त्यामुळे नाराजी असणारच. पण विविध संस्थांवर संधी देणार असल्याचे सांगितले होते. सुकुमार खोमणे सारख्यांनी समजून घेतले. पण, नंदकुमार जगतापांना बाजार समितीला सभापती केलं तरीपण बैलपोळ्याला बैल झाले, हे चांगलं नाही अशा शब्दात पवार यांनी सुनावले. तसेच वाघळवाडीनं काळे बोर्ड लावणं तर अजिबात आवडलं नसल्याचंही बोलून दाखवल. कारखान्याचा कर वाढवला, आरोग्य केंद्र दिलं, विकासकामांना निधी दिला. काय कमी केलं? असं सांगतानाच एकीकडे जेवायला बोलवता आणि काळे बोर्ड लावता? स्वार्थासाठी बैठका घेऊन भडकावलं जातंय हेही लोकांनी ध्यानात घेतलं पाहिजे. माझं नेतृत्त्व कोणाला मान्य नसेल तर त्याला रस्ता मोकळा आहे. माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान असणाऱ्याकडे जावा. किंवा दिलीप खैरेसारखा पॅनेल टाका. कधी माझ्याकडं कामं घेऊन येणार का नाही? यापुढं असा चावटपणा करू नका, असा इशाराही पवार यांनी दिला.

यावेळी सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, आमदार संजय जगताप, नंदकुमार जगताप, हनुमंत भापकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संभाजी होळकर यांनी केले. तर आभार राजवर्धन शिंदे यांनी मानले.

हे देखील वाचा

Pune Crime | विवाहितेचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी ! 2 वर्षापुर्वीच्या मर्डरचा पर्दाफाश, जाणून घ्या पुण्याच्या मुळशी तालुक्यातील प्रकरण

 

Solapur Crime | धक्कादायक ! पोलिस ठाण्याच्या परिसरातच 16 वर्षीय मुलावर खूनी हल्ला

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Ajit Pawar | Someshwar factory does not get my sugarcane stalk, but … – Ajit Pawar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update