Ajit Pawar | ‘त्या’ आरोपांवरुन अजित पवारांची विधानसभेत सडेतोड भूमिका, म्हणाले-‘होऊन जाऊद्या, आणि…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सहकारी साखऱ कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या (Sugar Factory Scam) आरोपांवर मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज (सोमवार) विधानसभेत (Legislative Assembly) सडेतोड भूमिका मांडली. अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी अगोदरही हा मुद्दा उपस्थित केला होता. सहकार मंत्र्यांनी अण्णा हजारे यांना जाऊन भेटावे व आतापर्यंत कोणकोणत्या यंत्रणांमार्फत चौकशा (Inquiry) झाल्या याची माहिती घ्यावी. ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला काय वस्तुस्थिती आहे हे कळू द्या. असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. यावर सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी लवकरच अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना चौकशीच्या अहवालाबाबत अवगत करु असे सभागृहात सांगितले.

चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही

भाजपचे आमदार योगेश सागर (BJP MLA Yogesh Sagar) यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबतचा प्रश्न विधानसभेत मांडला. याला अजित पवार (Ajit Pawar) आणि बाळासाहेब पाटील यांनी उत्तर दिले. कारण नसताना गैरसमज पसरविण्याचे काम केले जात आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री (CM) असताना अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. फडणवीस यांनी सीआयडी चौकशी (CID Inquiry) करायला सांगितली होती. ही चौकशी झाल्यानंतर यामध्ये काहीही निष्पन्न झाले नाही. यानंतर फडणवीस यांनी एसीबी (Anti Corruption Bureau (ACB) मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले. यामध्येही क्लिन चीट दिली, असे अजित पवार यांनी सांगितले.

त्यानंतर सरकार बदलल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाले. त्यांनी देखील आर्थिक गुन्हे अन्वेषण (Financial Crimes Investigation) मार्फत चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. ही चौकशी सुरु असताना सहकार विभागाने माजी न्यायाधीशांच्या (Former Judge) अध्यक्षतेखाली चौकशी समिती (Inquiry Committee) नेमली. न्यायाधीश जाधव यांच्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. यामुळे सीआयडी, एसीबी, आर्थिक गुन्हे अन्वेषण आणि न्यायाधीशांच्या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही. यापैकी दोन चौकशा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात तर दोन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

एखादा कारखाना विक्रीला निघाल्यानंतर राज्य सहकारी बँक (State Cooperative Bank) तो चालवायला देते. ज्यांना कुणाला कारखाने चालवायचे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जावे आणि परिस्थिती पहावी. लोक टीका करतात, पण कारखाना चालवायला कोणीही पुढे येत नाही.
विरोधी पक्षनेते, सभागृहातील सदस्य तसेच देशपातळीवरच्या नेत्यांचा मोठा गैरसमज झालेला असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

साखर विकल्यानंतर बँकेचे थकीत पैसे आणि शेतकऱ्यांना ऊसाची रक्कम द्यावी लागते.
ही वस्तुस्थिती सांगत राज्यातील कर्जबाजारी कारखान्यांची यादी अजित पवार यांनी वाचून दाखवली.
तोट्यात कारखाना गेल्यानंतर यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा बाऊ केला जातो.
मात्र त्यात सत्य नाही. हायकोर्टाने (High Court) काही कारखाने तोट्यात गेल्यामुळे विक्रीला काढले आहेत,
असेही अजित पवार म्हणाले.

Web Title : Ajit Pawar | sugar factory scam ajit pawar refutes all allegations in vidhan sabha 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Paracetamol Usage | अल्कोहोल घेतल्यानंतर घेत असाल पॅरासिटामॉलची गोळी तर व्हा सावध ! ‘या’ अवयवाचे होऊ शकते सर्वात जास्त नुकसान

 

Nushrratt Bharuccha Monokini Photo | स्विमिंग पूलजवळ नुसरत भरूचानं दाखवला बोल्ड अंदाज, मोनोकिना घालून सोशल मीडियावर केला कहर…

 

Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !