Rupali Thombare Patil | शरद पवारांवरील टीकेनंतर रूपाली पाटील यांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार; बिरोबाला घातलं ‘हे’ साकडं !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Rupali Thombare Patil | भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) शिल्पकार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर कडवट शब्दात टीका केली होती. मुंबईत (Mumbai) भाजप (BJP) प्रदेश कार्यालयाच्या बाहेर चार राज्यांच्या निवडणुकीत मिळलेल्या यशाच्या सेलिब्रेशनवेळी (Celebration) ते बोलत होते. गोपीचंद पडळकरांच्या या टीकेवर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रूपाली पाटील (Rupali Thombare Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही शरद पवार यांना गुरू मानलं असल्याचं म्हटलं होतं. त्यासोबतच पवारांचे बोट धरून आपण राजकारणात (Politics) आल्याचं मोदी म्हणाले होते. त्यामुळे फडणवीसांरखे (Devendra Fadnavis) 200 शरद पवारांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेले असतील. म्हणून बोलताना जरा शब्दरचना ही आमदाराच्या पदाची गरिमा राखणारी असली पाहिजे, असं रूपाली पाटील (Rupali Thombare Patil) यांनी म्हटलं आहे.

 

देवेंद्र फडणवीस नवीन नेतृत्त्व असून ते पवारांच्या मुलाच्या वयाचे आहेत. गोपीचंद पडळकर यांना सद्बुद्धी देवो यासाठी बिरोबाला साकडं घातलं आहे. पवार नाव ऐकलं तरी पडळकरांना झटके येत असतील कारण त्यांचं दर तीन महिन्याला असं वल्गर वक्तव्य असतं. शेवटी शिक्षणाचा अभाव, अशा शब्दात पाटील यांनी पडळकरांवर टीका केली.

भाजपने पडळकरांसारखे वाचाळवीर भाजपने तयार केले आहेत. वैयक्तित टीका करणे, आत्महत्या झालेल्या महिलांबाबत बदनाम करणे,
सरकारला वेठीस धरणे या सर्व गोष्टी भाजपचे नेते महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता मिळवण्यासाठी करत आहेत.
वास्तविक, गोपीचंद पडळकर यांच्याकडे ना व्हिजन (Vision) आहे ना पात्रता आहे.
तरूणांसाठी काही काम करायचं नाही, असं म्हणत रूपाली पाटील यांनी पडळकरांवर निशाणा साधला.

 

 

Web Title :- Rupali Thombare Patil | NCP sharad pawar Rupali Thombare Patil gopichand padalkar criticism on pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tata Group Share | टाटा ग्रुपच्या 4 स्टॉक्समध्ये आहे राकेश झुनझुनवाला यांची भागीदारी, तुम्ही सुद्धा खरेदी करणार का ?

 

PAN-Aadhaar Link पासून ITR फायलिंग पर्यंत… या महिन्यात ‘ही’ 5 कामे करणे आवश्यक

 

PF Interest Rate | 6 कोटी कर्मचार्‍यांना मोठा झटका ! PF वर मिळणार 40 वर्षातील सर्वात कमी व्याज, घटविले व्याजदर