अजित पवार Home Quarantine, परंतु VC द्वारे बैठकीला हजर राहणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar)सध्या होम क्वारंटाईन (Home Quarantine) झाले आहेत. दुदैवानं त्यांची कोरोना (Covid-19) चाचणी मात्र निगेटीव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्यानं अजित पवार यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. आजच्या नियोजित बैठकाही रद्द करण्यात आल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या.

गेले 2 दिवस अजित पवार यांच्या प्रकृती विषयी चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार यांना थोडा ताप असल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली होती. ती निगेटीव्ह आली आहे. परंतु थकवा जाणवत असल्यानं अजित पवार यांनी घरीच आराम करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्यांना पूर्ण विराम मिळाला आहे.

असं असलं तरी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) आमदारांची बैठक बोलवली आहे. संध्याकाळी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार उपस्थित राहणार असल्याचं त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. ते व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असंही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या कार्यालयात होणार जनता दरबार रद्द करण्यात आला आहे.

अजित पवार परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता. तरीही त्यांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर, परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले. हा दौरा आटोपून परतल्यानंतर त्यांना तापही आला होता. त्यामुळं कोरोना चाचणी केली. ती निगेटीव्ह आली असली तरी थकवा असल्यान ते घरीच आराम करत आहेत.