Ajit Pawar | ‘मानवी अवयवांची तस्करी करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे’ – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मानवी अवयवांची तस्करी (Human Organ Trafficking) करणाऱ्या व रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्यांना फाशीच्या शिक्षेची (Death Penalty) तरतूद करण्याची गजर आहे. अशा कडक तरतुदी केल्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील कुकर्म्यांना आळा बसणार नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले. तळेगाव जनरल हॉस्पिटल (Talegaon General Hospital) आणि कॉन्व्हलसंट होम (Convalescent Home) याचा संयुक्त उपक्रम म्हणून नव्यानेच सुरु झालेल्या कॅन्सर सेंटरच्या (Cancer Center) उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून अजित पवार (Ajit Pawar) बोलत होते.

 

अजित पवार (Ajit Pawar) पुढे म्हणाले, तसेच वैदकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा निकोप आणि सजग असला पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम यांची सांगड घालून जगणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असेही पवार म्हणाले. तसेच यावेळी अजित पवार यांनी तरुणांना सल्ला देखील दिला आहे. कर्करोग न होण्यासाठी तरुणांनी तंबाखू, गुटखा यापासून दूर राहिले पाहिजे. तंबाखू हा आयुष्य संपविण्यासाठी कारणीभूत आहे, असे पवार यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी कृष्णराव भेगडे (Krishnarao Bhegade) होते.
तसेच यावेळी कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री मदन बाफना (Madan Bafna),
आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke),
वृषालीराजे दाभाडे सरकार (Vrushali Raje Dabhade Sarkar),
मायमर मेडिकल कॉलेजच्या (Maimar Medical College)
व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा नागरे (Suchitra Nagre), संस्थेचे अध्यक्ष गणेश खांडगे (Ganesh Khandge)
व उपाध्यक्ष चंद्रभान खळदे (Chandrabhan Khalde) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

 

Web Title :- Ajit Pawar | those who smuggle human organs should be given death penalty leader of opposition ajit pawar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा