सायं. 6 वाजता राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी 6.10 वाजता केलं हे ट्विट, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज सायंकाळी तडकाफडकी राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी राजीनामा देताना याची पूर्व कल्पना पक्षातील कोणत्याही वरीष्ठ नेत्याला दिली नाही. अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना फोन करून राजीनामा मंजूर करण्याचा आग्रह आहे. राजीनामा अजित पवार यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहून दिल्याने त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला.

राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल असून त्यांच्याशी संपर्क होत नाही. त्यांना अनेक नेत्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र त्यांचाही संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी ईडीने केलेल्या कारवाई नंतर त्यांच्या पाठीशी उभे राहिल्या सर्वांचे आभार मानले आहेत.

अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज, मुंबईत आदरणीय साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार ! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर, दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील, याची खात्री आहे.