Ajit Pawar | ‘मविआत शक्य नाही, अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर आमच्यासोबत यावे’, केंद्रीय मंत्र्याची ऑफर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगल्या होत्या. यावर त्यांनी स्पष्टीकरण देत चर्चांना पूर्णविराम दिला होता. मात्र, त्यानंतर एका मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री (Chief Minister) होण्याची इच्छा बोलून दाखवली होती. यावरुन राजकीय वर्तुळात (Maharashtra Political News) पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातच आता केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे (RPI) नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यावर थेट शब्दात भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) राहून अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, असं आठवले यांनी सांगितलं.

पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी महाविकास आघाडीत राहून ते मुख्यमंत्री कधीच होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अजित पवार जे बोलले ते महाविकास आघाडीत राहून होणे शक्य नाही. अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी आमच्यासोबत आले पाहिजे. ते महायुती, एनडीएमध्ये (NDA) आले, तर भविष्यात त्यांचा विचार होऊ शकतो. मात्र, मविआ मध्ये राहून त्यांना मुख्यमंत्री होता येणार नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

भाजपचे खासदार गिरीश बापट (MP Girish Bapat) यांचे नुकतेच निधन झाले आहे.
त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक (Pune Lok Sabha Bypoll Election) लागण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात रामदास आठवले म्हणाले, भाजपने त्या जागेवर उमदेवार दिला तर आरपीआय त्याला पाठिंबा देईल.
दिवंगत गिरीश बापट यांनाही आम्ही पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्या जागेबाबत आमची मागणी नाही.
ज्यावेळेस भाजप उमेदवार जाहीर करेल, त्यावेळी आम्ही सोबत असू, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

Web Title :- Ajit Pawar | union minister ramdas athawale said if ajit pawar wants to become chief minister then he should join

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil On SRA In Pune | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या योजनांचा आढावा

Gulabrao Patil | ‘राजीनामा देण्याइतकी संजय राऊतांची लायकी नाही’, गुलाबराव पाटलांची सडकून टीका

Maharashtra Political News | एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार?, दिल्लीत हालचाली सुरू; संजय राऊतांचा दावा