Akola ACB Trap | फेरफारनोंद करुन 7/12 उतारा वेगळा करण्यासाठी लाचेची मागणी, तलाठी अँन्टी कप्शनच्या जाळ्यात

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलोपार्जीत शेतजमीनीची समान हिस्से वाटणीचा अनुकूल अहवाल पाठविल्याचा मोबदला म्हणून तसेच त्याची फेरफारमध्ये नोंद घेऊन 7/12 वेगळा करण्याकरिता 4 हजार रुपये लाच स्वीकारणाऱ्या (Accepting Bribe) बळापुर तालुक्यातील लोहारा डोंगरगाव येथील तलाठ्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Akola ACB Trap) रंगेहाथ पकडले. राजेश महादेव शेळके Rajesh Mahadev Shelke (वय-53 रा. संजूनगर अकोला जि.अकोला) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. अकोला एसीबीने (Akola ACB Trap) ही कारवाई शुक्रवारी (दि.10) केली.

याबाबत 50 वर्षाच्या व्यक्तीने अकोला एसीबीकडे (Akola ACB Trap) तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या भावाची वडिलोपार्जीत शेतजमीन आहे. या जमिनीचे समान हिस्से वाटणी चा अनुकूल अहवाल पाठविल्याचा मोबदला म्हणून तसेच त्यांची फेरफारमधे नोंद घेऊन 7/12 वेगळा करण्याकरीता राजेश शेळके याने दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अकोला एसीबीकडे तक्रार केली.

एसीबच्या पथकाने 28 फेब्रुवारी आणि 8 मार्च रोजी पडताळणी केली असता तलाठी (Talathi) राजेश शेळके याने तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. लाचेची मागणी केलेल्या 10 हजार रुपयांपैकी 4 हजार रुपये लाच घेताना शेळके याला रंगेहाथ पकडण्यात आले. राजेश शेळके विरुद्ध उरळ पोलीस ठाण्यात (Ural Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्र पोलीस अधिक्षक मारुती जगताप
(SP Maruti Jagtap), अपर पोलीस अधीक्षक अरुण सावंत (Addl SP Arun Sawant),
अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे (Addl SP Devidas Gheware),
उप अधीक्षक उत्तम नामवाड़े (DySP Uttam Namwade)
यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सचिन सावंत (Police Inspector Sachin Sawant),
पोलीस अंमलदार प्रदीप गावंडे, दिगंबर जाधव, किशोर पवार यांच्या पथकाने केली.

Web Title : Akola ACB Trap | Demand for bribe to alter and separate 7/12 transcript, Talathi in anti-caption net

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dapoli Sai Resort Scam | सलग 4 तास चौकशीनंतर सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Parbhani ACB Trap | सिंचन विहिरीची वर्क ऑर्डर मिळवुन देण्यासाठी लाचेची मागणी, परभणी पंचायत समितीमधील अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MLA Siddharth Shirole | विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल कामासाठी खास बैठक घ्यावी; आमदार शिरोळे यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी