Akshay Kumar | लागोपाठ फ्लॉप चित्रपटानंतर ‘या’ कारणासाठी अक्षयने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली; नक्की काय आहे हा प्रकार

पोलीसनामा ऑनलाईन टीम – अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) मध्यंतरी खूपच चर्चेत आला होता. अक्षय कुमारने आजपर्यंत बॉलीवूडला (Bollywood) अनेक हिट चित्रपट दिले आहेत. मात्र 2022 हे वर्ष अक्षय कुमारसाठी काही चांगले नसल्याचे पाहायला मिळाले. एका पाठोपाठ चार चित्रपट अक्षय कुमारचे (Akshay Kumar) बॉक्स ऑफिसवर (Box Office) आपटले गेले. एका मुलाखती दरम्यान याविषयी विचारले असता अक्षयने प्रेक्षकांची हात जोडून माफी मागितली. नक्की काय प्रकार आहे जाणून घेऊयात.

 

अक्षय कुमारने आज पर्यंत आपल्या कारकीर्दीत अनेक हिट चित्रपट (Hit Movie) दिले आहेत. त्याच्या अभिनयाने त्याने चाहत्यांच्या मनात स्वतःचे एक वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. मात्र यंदाचा 2022 या वर्षांमध्ये अक्षयने एकही हिट चित्रपट प्रेक्षकांना दिला नाही. त्याच्या या चित्रपटाने तो प्रेक्षकांची मने सुद्धा जिंकू शकला नाहीत. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या नजरा ‘फिर हेरा फेरी 3’ (Phir Hera Pheri 3) वर होत्या. मात्र या चित्रपटात परेश रावल (Paresh Rawal) यांनी अक्षय कुमार नाही तर कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) दिसणार याची घोषणा करतात चाहत्यांची मन तुटली. याबाबत अक्षय कुमारला मुलाखतीत विचारले असता त्यांनी यावर आपले मत मांडले.

 

या चित्रपटाबाबत विचारले असता अक्षय कुमार (Akshay Kumar) म्हणाला, “हेराफेरी हा चित्रपट माझ्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हेराफेरीमध्ये पुन्हा दिसण्यास मला देखील आवडले असते. मात्र या चित्रपटाच्या स्क्रिप्ट वर मी खुश नव्हतो त्यामुळे मी या चित्रपटातून माघार घेतली. जेव्हा हेराफेरी 3 मध्ये मी नसणार हे चाहत्यांना कळाले तेव्हा सोशल मीडियावर पाहिले की ‘नो राजू नो हेराफेरी’ (# No Raju Na Hera Pheri) असे टॅग जोरात वायरल होत होते ते पाहून मला स्वतःला खूप वाईट वाटले. माझ्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसाठी मी हेरा फेरी 3 चा भाग होऊ शकलो नाही. याबद्दल मी त्यांची माफी मागत आहे मला माफ करा”.

बॉलीवूडमध्ये चित्रपटांच्या अपयशाबद्दल बोलताना अक्षय म्हणाला, “मला खूप वाईट वाटते.
मी प्रेक्षकांसाठी त्यांच्या आवडीचा असा कंटेंट घेऊन आणू शकलो नाही.
मी प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचून आणण्यात अपयशी ठरलो आहे. यात चूक माझी आहे प्रेक्षकांची नाही.
मला समजून घ्यायला हवे प्रेक्षकांना नक्की काय पाहायला आवडणार आहे.
प्रेक्षकांना जे पाहायला आवडेल तेच आता मी करणार आहे. पुन्हा एकदा मी सुरुवात करायला तयार आहे.
आता मला काहीतरी वेगळे दाखवायचे आहे”.

 

Advt.

Web Title :- Akshay Kumar | akshay kumar apologies to fans for not being in hera pheri 3

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MP Supriya Sule | ‘… त्याशिवाय बातमी होत नाही ना’; सुप्रिया सुळेंचा गजानन कीर्तिकरांना टोला

Sanjay Raut | संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका; म्हणाले – ‘फुटिरांच्या गटात एक शिंदे कायम …’

Eng vs Pak Final | पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, जाणून घ्या काय आहे तो विक्रम?