सूर्यवंशी ट्रेलर : उशिरा आल्यानं अक्षय आणि अजयनं केली रणवीरची मज्जा, ‘ही’ दिली शिक्षा

पोलीसनामा ऑनलाइन टीम – रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समधील तिसरा सिनेमा सूर्यवंशी या सिनेमाचा ट्रेलर आजच (सोमवार दि 2 मार्च 2020) रिलीज झाला आहे. दीर्घकाळाासून चाहते ट्रेलरची वाट पहात होते. अखेर सिनेमाचा ट्रेलर समोर आला आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचिंग दरम्यान पहिल्या दोन सिनेमातील सुपरस्टारही आले होते.

सिंघम सिनेमात काम केलेल्या अजय देवगणनं आणि सिंबा सिनेमात केलेल्या रणवीर सिंगनं ट्रेलर लाँचिंगच्या इव्हेंटला उपस्थिती दाखवली. रणवीर सिंग या कार्यक्रमाला थोडा लेट झाला होता. यावेळी अक्षयनं त्याची चांगलीच मजा घेतली.

लेट झाल्यानंतर अक्षयनं घेतली रणवीरची मजा

सध्या सूर्यवंशी सिनेमातील सर्वच कलाकारांचा ऑफस्टेज व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडीओत दिसतंय की, अक्षय म्हणतो, “हा पहिला ज्युनियर आर्टीस्ट आहे ज्यानं 4-4 सीनियर्सना 40 मिनिटांपर्यंत वाट पहायला लावली आहे. व्हिडीओत रणवीर सिंग कान पकडच सिटअप्स मारताना दिसत आहे. स्पष्टीकरण देताना रणवीर म्हणतो, “मी खूप दुरून येतो सर. मेट्रोचं काम सुरू आहे. एकच लाईन सुरू आहे.” व्हिडीओत रोहित शेट्टी, कॅटरीना कैफ आणि करण जोहर हेदेखील फन करताना दिसत आहेत. सूर्यवंशी सिनेमा 24 मार्च रोजी रिलीज होणार आहे.