अक्षय कुमार दरवर्षी घेतो ‘ही’ ट्रीटमेंट

पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमार जर्मनीहून हायड्रोथेरपी ट्रीटमेंट घेऊन आला. दरवर्षी तो ही ट्रीटमेंट घेत असतो. शरीरा तंदुरूस्त ठेवण्यासाठी ही थेरपी अत्यंत लाभदायक आहे. अक्षय कुमार ही ट्रीटमेंट घेऊन भारतात परतल्यानंतर पुन्हा एकदा या ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. धावपळीच्या जीवनशैलीमध्ये तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी अनेकजण विविध उपाय करतात. काहीजण स्पा करतात. तसेच अनेकजण हायड्रोथेरपी घेत असतात.

हायड्रोथेरपीने थकवा दूर होतो. तसेच ती त्वचेसाठीही लाभदायक आहे. यामध्ये पाण्यामार्फत सर्व समस्यांवर उपचार करण्यात येतात. हायड्रोथेरपीचं एक सेशन अर्धा ते एका तासाचे असते. जेव्हा शरीर वेगवेगळ्या तापमानाच्या पाण्याच्या संपर्कात येते, त्यावेळी शरीर आणि मूडमध्ये बदल होतात. थंड पाण्याच्या संपर्कात आल्याने शरीराला एक झटका लागतो. जो शरीर मजबुत होण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. थंड पाण्यामुळे रक्ता धमन्या लवचिक होऊन शरीराला रक्त आणि ऑक्सिजन मिळतो. शरीराला गरम पाणी मिळाल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि शरीरातील रक्त प्रवाह वाढतो.

या थेरपीचे विविध प्रकार असून त्यापैकी बालनेओ थेरेपीमध्ये पाण्याच्या टबमध्ये काही हर्बल उत्पादने टाकून आंघोळ केली जाते. यामुळे शरीराची स्वच्छता, त्वचेला पोषण आणि ऊर्जा मिळते. अरोमा बाथही याच थेरपीचा एक भाग असून या थेरपीमध्ये अत्तर, फूल, खस इत्यादी वापरण्यात येते. ज्यामुळे तणाव आणि चिंता दूर होतात. थर्मल थेरेपीमध्ये कोमट पाण्याने आंघोळ करण्यात येते. सर्वात आधी त्वचा रोग आणि इन्फेक्शनपासून सुटका करण्यासाठी डोंगरांमधील प्राकृतिक जल स्त्रोत, ज्यांमध्ये गंधक असते त्यामध्ये आंघोळ केली जाते. आता हिच सुविधा शहरांमध्ये असलेल्या स्पा सेंटर्समध्ये आहे. याचा वापर उन्हाळ्यामध्ये कमी करण्यात येतो. कारण उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याने आंघोळ करणे शक्यतो लोक टाळतात. लाल चट्टे, खाज इत्यादींवर ही थेरेपी उपयोगी आहे. थालासो थेरेपीमध्ये समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यात येतो. समुद्रामध्ये अनेक प्रकारची हर्बल उत्पादने आणि खनिज तत्व आढळून येतात. जे रक्तप्रवाह ठिक करण्यासाठी मदत करतात. तसेच तणाव दूर करून मेंदूला चालना मिळते.

हायड्रोथेरपीत शॉवर बाथ घेतली जाते. यामुळे मेटाबॉलिज्म वाढते आणि शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. शॉवर बाथ तणाव आणि थकवा दूर होतो. सिट्ज बाथ या प्रकारामध्ये एक पाय गरम पाण्यात ठेवायचा असतो तर दुसरा पाय थंड पाण्याते ठेवला जातो. यामुळे मासिक पाळीच्या सर्व समस्या दूर होतात. वहर्लपूल बाथ या प्रकारामध्ये गरम पाण्याच्या बुडबुड्यांसोबत आंघोळ केली जाते. यामुळे स्नायूंना आराम मिळतो. परंतु, ही ट्रीटमेंट घेण्यापूवी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.